शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासांत सापडले आरोपी

By admin | Updated: April 13, 2015 01:57 IST

खिडकीतील चावी घेऊन कुलूप उघडत घरात प्रवेश केला. कपाटातील सोने व रोख असा ५ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज

वरोरा पोलिसांचे यश : सहा लाखांचे दागिने चोरी प्रकरण वरोरा : खिडकीतील चावी घेऊन कुलूप उघडत घरात प्रवेश केला. कपाटातील सोने व रोख असा ५ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. घराचे आणि कपाटाचे कुलूप शाबुत असल्यामुळे व श्वान पथक घरातच फिरल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. मात्र वरोरा पोलिसांनी अवघ्या ४८ तासात दोन युवकांना ताब्यात घेऊन दोघांकडून ५ लाख ४८ हजाराचे सोने व रोख जप्त केले.आकाश वामन कुरेकार (२५) रा. शिवाजी वार्ड वरोरा व संदिप दादाजी मत्ते (२२) रा. आंबेडकर लेआऊट अशी आरोपींची नावे आहे. वरोरा शहरातील शिवाजी वॉर्डातील गजानन कुरेकार हे ९ एप्रिल रोजी आपल्या कुटुंबियासह वरोरा तालुक्यातील शेंबळ येथे नामकरण सोहळ्यासाठी गेले होते. ९ एप्रिलला रात्री घरी परत आले. १० एप्रिल रोजी सकाळी अंगावरील दागिने कपाटात ठेवण्यास गेले असता कपाटातील २५ तोळे सोने व १९ हजार रुपये आढळून आले नाही. १० एप्रिल रोजी वरोरा पोलिसात तक्रार दिली. वरोरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करीत श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.परंतु घरच्यांनी वस्तु हाताळल्याने ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाकडूनही ठोस काही हाती लागले नाही. चोरी करताना दाराचे कुलूप चावीने उघडल्याने चावी खिडकीत ठेवत असल्याची माहिती असणाऱ्यावर वरोरा पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. चोरी झाल्यानंतर पोलिसांनी आकाश वामन कुरेकार (२५) रा. शिवाजी वार्ड वरोरा व संदीप दादाजी मत्ते (२२) रा. आंबेडकर लेआऊट यांना संशयावरून ताब्यात घेऊन विचारपूस केली. परंतु प्रारंभी त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कुबली दिली.सोने व रोख आकाशने आपल्या घरातील बॅगमध्ये ठेवले व काहीही झाले नाही, असा बनाव करीत वावरत होते. आकाश व संदीपने चोरी केल्याची कबुली देते. संपूर्ण सोने व रोख असा पाच लाख ४८ हजारांचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल सांगणे, सहायक फौजदार नितीन जाधव, पोलीस हवालदार उमाकांत गौरकार, दामोधर करंबे, राकेश तुराणकर, निकेश ठेंगे, निलेश मुंडे, अनिल बैठा यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)अशी केली चोरी९ एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच वाजताच्या सुमारास आकाश कुरेकार खिडकीतील चावी घेऊन घरात गेला व संदीप मत्ते याने बाहेरून दार लावून देत तो रस्त्यावर उभा राहिला. आकाशने कपाटातील चावी घेऊन कपाट उघडले व त्यातील २५ तोळे सोने व १९ हजार रुपये रोख एका प्लॅस्टीकमध्ये टाकले. कपाट पूर्वी प्रमाणेच लावले. काम पूर्ण झाले म्हणून संदीपच्या मोबाईलवर कॉल केला. त्यानंतर संदीपने खिडकीतील चावी घेऊन दार उघडले. आकाश व संदीपने दाराला परत कुलूप लावून चावी खिडकीत ठेवली. नातेवाईकच निघाले चोरयामधील आरोपी आकाश वामन कुरेकार हा २००५ मध्ये मिल्ट्रीमध्ये नोकरीस लागला होता. जानेवारी २०१५ मध्ये मिल्ट्रीमध्ये कर्तव्यावर असताना तो चक्कर येऊन पडल्याने दोन महिने दिल्ली येथे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला पॅरलेसीसचा झटका आल्याने तो मागील महिन्यात वरोरा येथे आराम करण्यासाठी आला होता. आकाशने त्याचा नातेवाईक असलेल्या संदीप मत्तेला सोबत घेऊन चोरीची योजना आखली. चोरट्यांनी ज्यांच्या घरी चोरी केली, ते त्यांचे नातेवाईकच निघाले. चोरीचा ऐवज आकाशने आपल्या मिल्ट्रीमधून मिळालेल्या पेटीत ठेवला होता, हे विशेष.