शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार सेवकाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

By admin | Updated: May 28, 2015 00:01 IST

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची गावकऱ्यांची ...

चौकशी कासवगतीने : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीनवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची गावकऱ्यांची ओरड असताना चौकशी मात्र कासवगतीने होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नवरगाव येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत २०१३ ते २०१५ या कालावधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना केली होती. रोजगार हमीच्या कामामध्ये एकाच जॉबकार्डवर त्या कुटुंबातील व्यक्तीव्यतिरिक्त इतर नागरिकांचे नाव टाकून हजेरी लावून बिल उचलले तर एकाच व्यक्तीचे कामाचे पैसे अलग अलग बँक अकाऊंटमधून परस्पर उचलले, एक व्यक्ती २०१३ मध्ये ६९ दिवस, २०१४ मध्ये २२५ दिवस, तर २०१५ मध्ये २० दिवस कामावर दाखविण्यात आली. परंतु प्रत्येक मजुराला १०० दिवस काम असताना २०१४ मध्ये एकाच व्यक्तीला २२५ दिवस कामावर लावल्याची चर्चा आहे. एकाच मजुराची एकाच दिवशी दोन ठिकाणच्या कामावर नोंद घेतल्या गेली तर काही व्यक्तीला दोन बायका- मुलं दाखवून त्यांच्याही नावे मजुरी उचलली असल्याचा आरोप आहे. एक ग्रामपंचायत सदस्य कामावर गेला नाही. मात्र त्याच्याही नावाने पैसे उचलले आहेत. काही मजूर अस्तित्वातच नाही. अशाही व्यक्तीची हजेरी लावून पैशाची उचल केली. माळी मोहल्ला ते बांध तलाव पांदण रस्त्यावर बोल्डर न टाकताच पैशाची उचल केली. प्रकाश खोब्रागडे ते वामन बोडणे पांदण रस्त्यावर मुरुम न टाकताच पैशाची उचल केली, असे विविध आरोप तक्रारकर्त्यांनी रोजगार सेवकावर लावलेले आहेत.तसेच नवरगाव येथे १३० शोषखड्डे खोदण्याचे दाखवून एका शोषखड्ड्याच्या मागे १८०० रुपयेप्रमाणे पैशाची उचल केली असून प्रत्यक्षात मात्र ३० ते ३५ शोषखड्डेही आता उपलब्ध नाहीत. काही बुजलेले तर काही खड्डेच खोदले नसल्याचा आरोपही तक्रारकर्त्यांनी केला आहे.मात्र या संपूर्ण प्रकरणात केवळ रोजगार सेवकावरच भ्रष्टाचाराच्या आरोपाचा ठपका तक्रारीत असून इतर अधिकाऱ्यांवर आरोप नाही. २२ मे रोजी चौकशी करण्यासाठी तालुकास्तरावरुन समिती आली. काही नागरिकांचे बयाण घेतले व तक्रारकर्त्यांचे बयाण घेतले. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी ठप्प आहे. यापूर्वीही २० फेब्रुवारी २०१४ ला येथील ग्रा.पं. सदस्य आनंदराव टिपले यांनी नर्सरीमधील रोपाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा आरोप करुन वरिष्ठ स्तरावर तक्रार केली होती. ग्रा.पं. नवरगाव येथील मग्रारोह १०० कोटी वृक्ष लागवडी योजनेंतर्गत २१ हजार १०० रोपांची नर्सरी तयार करण्यात आली. त्यापैकी १ हजार ३२० रोपांची लागवड केली. विविध संस्थांना ३ हजार ८५० रोपे वाटप केली तर शेतकऱ्यांना १३ हजार ९३० रोपे वाटप केली. म्हणजेच १९ हजार १०० लागवड वाटप केली व शिल्लक रोपे २ हजार दाखविण्यासाठी जाळल्याचा आरोप तक्रारीत केला होता. या प्रकरणाची चौकशी झाली.रोजगार सेवकाने १० ते १२ हजार रोपे जाळल्याचा आरोप ठेवून कार्यवाहीस पात्र असल्याचा ठपका ठेवला तर ग्रामविकास अधिकारी बी.सी. शंभरकर यांनीसुद्धा नर्सरीमधील रोपांची नोंद साठा रजिस्टरवर घेतली नसल्याने कर्तव्यात कसूर केली. तेसुद्धा जि.प. सेवा शिस्त १९६४ चे नियम ४ नुसार कारवाईस पात्र असल्याचा ठपका ठेवण्यात आला. आता पुन्हा भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या आहेत. (वार्ताहर)