शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना ठाण्यातील स्वागतकक्षात पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:22 IST

येथील मालविय वॉर्डातील रुक्मिणी रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धाड टाकली. रेस्टॉरंटची झडती घेतली असता त्यांना विदेशी दारूसाठा आढळून आला.

ठळक मुद्देवरोरा ठाणेदाराचा प्रताप : दारूविक्री प्रकरणात केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : येथील मालविय वॉर्डातील रुक्मिणी रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धाड टाकली. रेस्टॉरंटची झडती घेतली असता त्यांना विदेशी दारूसाठा आढळून आला. रेस्टॉरंटच्या नावावर दारू विक्री करणाऱ्या रुक्मिणी रेस्टॉरंटचे मालक माजी नगरसेवक विक्रम उर्फ विलास कन्नमवार यांच्यासह तीन जणांना रात्रीच अटक केली. मात्र त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यातील स्वागतकक्षात पाऊणचार खाऊ घातला. एका अवैध दारू विक्रेत्याला पोलीस ठाण्यात अशी व्हीआयपी वागणूक देणाºया वरोरा ठाणेदाराविषयी संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे.ठाणेदार उमेश पाटील यांना रुक्मिणी रेस्टॉरंटमध्ये दारू विकली जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच शनिवारी रात्री ते एकटेच घटनास्थळी पोहोचले. रेस्टॉरंटचे मालक घटनास्थळी दारू विकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षकांनी त्वरित आपल्या कर्मचाºयांना बोलावून दुकानाची झडती घेतली. यादरम्यान विदेशी दारूच्या अकरा बॉटल हस्तगत करण्यात आल्या. सोबतच दारू गुत्ता नियमानुसार ३५ हजारांचा मुद्देमाल त्यामध्ये टेबल-खुर्ची दारूचे रिकामे ग्लास इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळी काऊंटरवर बसलेले मालक माजी नगरसेवक विक्रम कन्नमवार (४२) रा.अंबादेवी वार्ड वरोरा यांच्यासह रेस्टॉरंटचे व्यवस्थापक योगेश ज्ञानेश्वर पचारे (३०), रवींद्र किशोर धाडसे (१८), भास्कर मोतीराम कोटेवार (५२) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या अटकेतील आरोपींना इतर दारू विक्रेत्यांसारखी वागणूक न देता व्हीआयपी वागणूक देण्यात आली. आरोपींची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना पोलिस स्टेशनमधील स्वागतकक्षात पाऊणचार खाऊ घालण्यात आला. एकीकडे माजी नगरसेवक शरद मडावी यांचे चिरंजीव अटकेत असताना त्यांना घरून आणलेला डबा नाकारण्यात येतो तर दुसरीकडे माजी नगरसेवक विक्रम कन्नमवार यांना स्वागतकक्षात दिवाळीचा पाहुणचार दिला जातो. दारू प्रकरणातील दोन वेगवेगळ्या वागणुकीमुळे पोलीस कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सर्व घटनेमध्ये वरिष्ठांनी लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.