शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मूल-चंद्रपूर मार्गावर अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:33 IST

चंद्रपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राट जिल्ह्याबाहेरील कंपनीला दिले असून मूल ते जानाळा पर्यंत डांबरीकरण असलेल्या रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून रस्ता खोदून : अपघातात वाढ, वाहनधारकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चंद्रपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राट जिल्ह्याबाहेरील कंपनीला दिले असून मूल ते जानाळा पर्यंत डांबरीकरण असलेल्या रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली आहे. परंतु, सहा महिने लोटूनही रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या अर्धवट कामामुळे या मार्गावर अनेक अपघात घडत आहेत.चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील ६ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. मूलपासून तर जानाळापर्यंत चांगल्या स्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून टाकण्यात आला. त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली असून यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत.पावसामुळे तर या मुख्य मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहन चालविणे घातक ठरत आहे. या रस्त्यावर रोज किरकोळ अपघात घडत असून कधी कोणाचा नाहक बळी जाईल, हे सांगता येत नाही.बुध्द टेकडी ते आगडीपर्यंत सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून १४ मिटरचा हा मुख्य रस्ता तयार करण्यात येणार आहे. वनविभागाचे वृक्ष रस्त्याच्या मधे येत असल्यामुळे या रस्त्याचे काम थांबविण्यात आल्याचे एका राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तुर्तास या रस्त्याचे काम रखडले असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.