शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांची रुग्णालयाला आकस्मिक भेट

By admin | Updated: June 19, 2014 00:01 IST

जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. या भेटीत त्यांनी आकस्मिक, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, आयसीयू व एसएनसीयू या विभागाची पाहणी केली.

चंद्रपूर: जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. या भेटीत त्यांनी आकस्मिक, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, आयसीयू व एसएनसीयू या विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी.धोटे व अधिकारी उपस्थित होते. आंतररुग्ण विभागातील कक्ष एकमध्ये जाऊन डेंग्यू तापाच्या रुग्णांची जिल्हाधिकाऱ्यांनी पहाणी केली. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांचे प्लेटलेट काऊंट किती झाले याविषयी विचारणा केली. रुग्णालयाच्या अहवालानुसार डेंग्यू पॉझिटिव्ह ३५ रुग्णांची पैकी १९ रुग्णांचे प्लेटलेट करण्यात आले असून ते नॉर्मल रेंजमध्ये आढळले. डेंग्यू रुग्ण जरी भरती असले तरी सर्व रुग्ण बरे झाले असून याबाबत नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने यावेळी सांगितले.कक्ष क्रमांक एकमध्ये रुग्णसंख्येपेक्षा खादटांची संख्या या भेटीत कमी दिसली. रूग्ण ३७ आणि खाटांची संख्या मात्र २५ दिसली. हे लक्षात घेवून खाटा वाढविण्याकरिता प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची पाहणी केली. ७५ ते ८० टक्के लाभार्थ्यांना प्रसुतीकरिता नेण्याची व आणण्याची सुविधा पुरविली जाते. त्यामध्ये एक वर्षापर्यंत नवजात बालकाला ने आण करण्याची सुविधा देण्यात येते. त्याकरिता नातेवाईकांनी १०२ नंबरवर फोन करून सेवेचा लाभ घेण्यात यावा.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मॅमोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय, ४ डीईको, कलरडॉपलर, व्हॅस्कुलर डॉपलर, हफएनएसी, हिस्टोपॅथालॉजी, बॉडी फल्युड, एक्झामीनेशन, पॅप स्मिअर थायरॉइड फनक्शन टेस्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक एजंट, सिरम सोडियम आणि पोटॅशियम, सिए १२५, आयएनआर, सीए १९ ए, बोनमॅरो एक्झामिनेशन, कालपोस्कोपी एचबी १ एसी, इत्यादी चाचण्या आऊटसोर्सिंग मार्फत करण्यात येतात. तसेच एन सी डी तर्फे ३० वर्षावरील रुग्णांचे ब्लड शुगर व बिपी करण्यात येते. जनतेनी व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करून रुग्णालयीन सुविधाचा लाभ घ्यावा.या रुग्णालयातर्फे डॉ. गांधी छाती रोग तज्ज्ञ उपलब्ध आहे. तरी रुग्णांनी फायदा घ्यावा. रुग्णालयात ब्लड बँक उपलब्ध आहे, तसेच रुग्णालयात मोफत श्वानदंश लस तसेच सर्पदंश लस देण्यात येते. रुग्णालयातील सर्व सुविधांचा जनतेनी फायदा घ्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.