शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून माळरानावर राहत असलेल्या गावकऱ्यांपैकी एका महिलेचा आकस्मिक मृत्यू; महाराष्ट्र तेलंगणच्या सीमेवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:25 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या व तेलंगण व आंध्रातील आरक्षण वादापोटी संभावित हल्ल्याच्या भयाने आता उघड्या माळरानावर रहात असलेल्या प्रेमनगरातील एका महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देसीमावादात अडकले प्रेमनगरहल्ल्याच्या भयापोटी अख्खे गाव राहत आहे उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या व तेलंगण व आंध्रातील आरक्षण वादापोटी संभावित हल्ल्याच्या भयाने आता उघड्या माळरानावर रहात असलेल्या प्रेमनगरातील एका महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यापासून २७ कि.मी. अंतरावर प्रेमनगर हे गाव १० वर्षांपूर्वी वसले. तेथे उदरनिर्वाहासाठी आलेल्या नागरिकांकरिता महाराष्ट्र सरकारने पिण्याच्या पाण्याची, विजेची व रस्त्याची व्यवस्थाही करून दिली. मात्र तेलंगणा व आंध्रप्रदेशातील आरक्षणाच्या वादामुळे बंजारा व आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला. प्रेमनगरची नोंद महाराष्ट्रासोबत तेलंगणातही करण्यात आली असल्याने आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार या नाराजीपोटी तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरवर हल्ला चढविला होता. गाव उठवा नाहीतर घरे जाळू अशी आक्रमक व हिंसक भूमिका तेलंगणवासियांनी घेतल्यामुळे प्रेमनगरातील नागरिकांनी ते गाव सोडून माळरानावर बस्तान मांडले होते. तेलंगणच्या नागरिकांनी या गावावर आक्रमण करून विवाहाचा मंडपही पेटवून दिल्याची घटना घडली होती. यावेळी अख्खअया गावाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.तेलंगणचे नागरिक पुन्हा हल्ला करतील या भयाने गावकऱ्यांनी गाव सोडून आपल्या गोठ्यात, शेतात वा नातेवाईकांकडे राहणे सुरू केले. थंडीचा कडाका सहन करीत लहान मुले, स्त्रिया व वृद्ध नागरिक उघड्या माळरानावर राहत आहेत. शनिवारी पहाटे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव गुणाबाई उत्तम जाधव असे असून तीही आपल्या शेतात राहत असल्याचे समजते.

 

टॅग्स :Governmentसरकार