शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बीआयटी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:12 IST

बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. सदर कर्मचाºयाचे मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने तो मानसिक तणावात होता.

ठळक मुद्देआर्थिक मदतीसाठी मृतदेह घेऊन महाविद्यालयात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. सदर कर्मचाºयाचे मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने तो मानसिक तणावात होता. अशातच त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत व पत्नीला नोकरी देण्याच्या मागणीसाठी बीआयटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी मृतदेह महाविद्यालयात नेऊन आंदोलन केले.अमर महादेव नगराळे (३२) असे मृतकाचे नाव आहे. तो तालुक्यातील मानोरा येथील रहिवासी असून होमगार्ड म्हणूनही तो कार्यरत होता. अमर नगराळे हा मंगळवारी रात्री १० वाजता आपल्या एमएच ३४ एक्स ८१७० या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने येथून मानोराकडे जात होता. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. मृतक अमर हा बामणी येथील बिआयटीचा कर्मचारी होता.बीआयटी कर्मचाºयांचे मागील आठ महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. थकित पगाराच्या मागणीकरिता अमर नगराळे हा उपोषणालाही बसला होता. वेतन मिळत नसल्याने अमर मागील अनेक महिन्यांपासून मानसिक तणावात होता. अशातच त्याचा असा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी बिआयटी येथील कर्मचाऱ्यांनी अमरचा मृतदेह थेट महाविद्यालयात नेला. आर्थिक मदत व पत्नीला नोकरी देण्याची मागणी रेटून धरली. दरम्यान महाविद्यालय व्यवस्थापनाने मृतकाच्या पत्नीला नोकरीवर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत अंत्यसंस्कार करण्यात आले.बीआयटीमधील कर्मचाऱ्यांचे मागील काही महिन्यांचे वेतन थकित आहे. वेतन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. अमर नगराळे यांचा अपघाती मृत्यू झाला. ते संस्थेत नऊ वर्षांपासून होते. त्यांच्या पत्नीला नोकरीत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.- संजय वासाडे, कार्याध्यक्ष, कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, बल्लारपूर