शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाला १०० टक्के निकालाचे ग्रहण

By admin | Updated: September 21, 2016 00:46 IST

विनाअनुदान व कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या व मृल्यांकनास पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना...

तीन वर्षांच्या निकालाची अट : विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे निषेधरत्नाकर चटप नांदाफाटाविनाअनुदान व कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या व मृल्यांकनास पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला. या निर्णयात शाळांना दहावीचा निकाल सतत तीन वर्षे १०० टक्के देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. १०० टक्के निकाल नसणाऱ्या शाळांची मान्यता काढून त्या शाळा बंद करण्यात येतील. त्यानंतर या शाळांमधील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत समायोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात शिक्षक व संस्थाचालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.गेल्या १६ वर्षांपासून विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांचा अनुदानासाठी संघर्ष सुरू आहे. त्यासाठी बरीच आंदोलने व मोर्चबांधणी केल्यानंतर ३० आॅगस्ट २०१६ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २० टक्के अनुदानाबाबत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होईल, याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले होते. सदर शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. परंतु यातील जाचक अटी व तरतुदींमुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. २० टक्के अनुदानामुळे राज्यातील १९ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना फायदा झाला असता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांना सुटकेचा नि:श्वास सोडविता आला असता. मात्र १६ वर्षांच्या तपश्चर्येनंतर १०० टक्के निकालाच्या अटीमुळे २० टक्के अनुदानाचा लाभ एकाही शाळांना मिळणार नाही, असे चित्र दिसत आहे.दहावीच्या निकालाची मागील सरासरी बघता आजपावेतो काही निवडक शाळा वगळता इतर शाळांना १०० टक्के निकाल लावणे शक्य झाले नसल्याचे दिसते. त्यामुळे यापुढेही १०० टक्के निकाल लागेलच, याबाबत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये विनावेतन काम करताना आधीच खचलेल्या आणि मानसिक दडपण असलेल्या शिक्षकांवर या निर्णयामुळे मोरखड आल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षानंतर २० टक्के का होईना, ते मिळणार याचा आनंद व्यक्त होताना दुसरीकडे मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे निषेधचंद्रपूर जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे या शासन निर्णयाची जिल्हा परिषद कार्यालयासमोर सोमवारी होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल मुसळे, उपाध्यक्ष किशोर धानोरकर, प्रा. रमेश पामपर, प्रा. प्रमोद वाघाडे, संदीप खिरटकर आदीची उपस्थिती होती.