सुनील घुगुल (३५) रा. जुना कोंढा असे आरोपीचे नाव आहे. कोंढा येथील महिला आपल्या दोन मुलींसह माहेरी आली होती. काही कामानिमित्त बाहेर गेली असताना संधीचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या आरोपीने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब घाबरलेल्या पीडित मुलीने आई येताच तिला सांगितली. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात देताच ठाणेदार सुनीलसिंग पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वत: गावात गेले असता आरोपी पसार झाला होता. आरोपीचा शोध चालू असून त्याच्यावर अत्याचार व पाेक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST