शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांअभावी गडचांदूर रूग्णालय सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:42 IST

कोरपना, जिवती तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात.

ठळक मुद्देएक्सरे मशीन धूळखात : उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : कोरपना, जिवती तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयातील विविध समस्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डॉक्टरांची व इतर पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य सेवा सलाईनवर असल्याचे दिसून येते.रुग्णालयासाठी महत्त्वपूर्ण असलेले वैद्यकीय अधीक्षकचे पद अजूनही भरले नाही. वैद्यकीय अधिकाºयाचेही दोन पदे रिक्त असून केवळ एकच पद भरले आहे. येथे डॉ. धर्मेद्र सुलभेवार कार्यरत असून त्यांना सुद्धा डेप्युटेशनवर पाठविले आहे. येथे कार्यरत डॉ. विजय कळसकर यांना कोरपना येथे डेप्युटेशनवर पाठविले असून आयुषमध्ये डॉ. सय्यद जुबेर, आयुर्वेदीकचे डॉ. अनिल घुले व होमिओपॅथीचे डॉ. अश्विनी येडे व प्रणाली लांजेवार कार्यरत आहे.स्टाफ नर्सच्या एकूण सात पदापैकी केवळ चार पदे भरली असून तीन पदे रिक्त आहेत. ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्ण कोरपना-जिवती तालुक्यातून उपचारासाठी येथे येतात. मात्र या रुग्णांना पुरेशी वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे. ५० बेडची क्षमता निर्माण करण्यासंबंधी प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. मात्र वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन होणे गरजेचे आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. या ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन आहे. मात्र, एक्सरे तंत्रज्ञ नसल्यामुळे ही मशिन धूळ खात पडली आहे. एक्सरेसाठी रुग्णांना बाहेर जावे लागते. सोनोग्राफी मशिन नसल्याने त्यासाठी सुद्धा बाहेर जावे लागते. यामुळे गरीब रुग्णांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथील रिक्त पदे त्वरीत भरणे गरजेचे असून याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूलाच एनसीडी विभागाचे कार्यालय आहे. तेथेच वैद्यकीय अधीक्षकचे कार्यालय असून या कार्यालयाची दुर्दशा झाली आहे, अशा अनेक समस्या या रूग्णालयात आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासनाने येथील समस्यांची दखल घेत रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे.गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० च्या जवळपास रुग्ण येतात. त्यामुळे सध्याचे बेड अपूरे पडत असल्याने ५० बेडची क्षमता करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे आवश्यक आहे.- डॉ. धर्मेद्र सुलमेवार, वैद्यकीय अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर.तालुक्याच्या दर्जाचे असलेले औद्योगिक शहर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयाची दुर्दशा बघता रिक्त पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची वैद्यकीय सेवेची गरज भागविताना शासन आरोग्य सेवेवर करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र त्याचा लाभ योग्यरित्या मिळताना दिसत नाही.- सुभाष धोटे, माजी आमदार राजुरागडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा आरोग्य मंत्री यांच्याकडे निवेदन दिले आहे. आ. धोटे याबाबत पाठपुरावा करीत आहेत.-सतीश उपलेंचवार, अध्यक्ष, भाजप गडचांदूर शहर.