शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेषनगर जलमय

By admin | Updated: August 5, 2016 00:53 IST

बारई तलावाचे ओव्हरफ्लो पाणी नालीद्वारे सोडले गेले. ते पाणी सदोष नाली व पुढे नालीची पाईपलाईन बुजल्याने शेषनगरात साचू लागले आहे.

बारई तलाव ओव्हर फ्लो: शेषनगरात व परिसरात पाणी ब्रह्मपुरी: बारई तलावाचे ओव्हरफ्लो पाणी नालीद्वारे सोडले गेले. ते पाणी सदोष नाली व पुढे नालीची पाईपलाईन बुजल्याने शेषनगरात साचू लागले आहे. त्यामुळे तलावाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. यापूर्वी लोकमत मध्ये ‘शेषनगर जलमय होणार’ असे वृत्त प्रकाशित केले होते, ते खरे ठरत आहे. शेषनगरला लागून असलेल्या बारई तलावाच्या पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. शेषनगरच्या बाजूने मोठी नाली ओव्हरफ्लो पाण्यासाठी काढण्यात आली. परंतु ही नाली पाणी पुढे वाहून जाण्यास सदोष यंत्रणा असल्याने तलावाचे पाणी शेषनगरकडे धावले. तलावाचा ओव्हरफ्लो रोखल्यास पाळ फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे ते पाणी आता शेषमंदिर, बावनकर व पुढे अनेक घरात व रस्त्यावर पसरलेले आहे. रात्रभर हे पाणी असेच वाहत राहीले तर अध्यापेक्षा जास्त शेषनगर जलमय होण्याची चिन्हे आहेत. हा प्रकार नागरिकांनी व लोकमतने लक्षात आणून दिला. पण त्यावर थातूरमातूर कार्यवाही करुन सोडण्यात आल्याने आज पुन्हा असा प्रसंग निर्माण झाला आहे. प्रत्यक्षदर्शीनी प्रशासनाला दोषी ठरविले आहे. प्रशासनाने पुढच्या नालीची योग्य सफाई केली नाही, बांधकाम विभागाने मुख्य नालीच्या पाईप लाईनवर व समोरच्या पाईप लाईनचे पाईप खाली असल्याने पाणी योग्य रीत्या वाहून जात नाही. त्यामुळे उतारानुसार शेषनगरकडे लहान नाल्यांच्या माध्यमातून पाणी उलटे वाढून घरामध्ये व रस्त्यावर जमा होत आहे. लोकमतच्या वृत्ताने पाळीचे साईडिंग भरणे व नालीचा मार्ग सुरु करुन काम केल्याचा बनावटपणा केल्या असला तरी आता मात्र शेषनगर जलमय होत असल्याने प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)