शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एबीपीएएस’ स्थायी समितीपुढे आलेच नाही

By admin | Updated: May 29, 2016 00:56 IST

महानगर पालिका क्षेत्रातील बांधकामांना मंजुरी देण्यासाठी आणि ही प्रकरणे तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी

आयुक्तांकडून राजकारण : लहामगे यांचा आरोपचंद्रपूर : महानगर पालिका क्षेत्रातील बांधकामांना मंजुरी देण्यासाठी आणि ही प्रकरणे तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अंमलात येणाऱ्या ‘आॅटोमेटेड बिल्डिंग प्लॅन अप्रूवल सिस्टम’ (एबीपीएएस) ला मंजुरी देण्यासाठी नगरसेवकांकडून ४२ लाख रूपयांची मागणी करण्याच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. हे प्रकरण स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आलेच नसताना आयुक्त कोणत्या आधारावर तसे वक्तव्य करीत आहेत, असा प्रतिप्रश्न स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी उपस्थित केला आहे.एबीपीएसचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी काही नगरसेवकांनी ४२ लाख रूपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात आपले मत दर्शविताना स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे मनपाच्या आयुक्तांनी म्हटले होते. मात्र स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी हे प्रकरण स्थायी समितीपुढे प्रलंबित असल्याचे आयुक्तांचे वक्तव्य फेटाळून लावले आहे. एवढेच नाही तर स्थायी समिती आणि त्यात सदस्य असलेल्या १६ नगरसेवकांना आयुक्तांकडून राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या बदनाम केले जात आहे, असा आरोप लहामगे यांनी एका पत्रकातून केला आहे. मनपा आयुक्त सुधीर शंभरकर आणि स्थायी समिती असा नवा वाद आता एबीपीएएसच्या मंजुरी प्रकरणावरून उद्भवू पहात आहे. आयुक्तांसारख्या महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी खोटी माहिती माध्यमांना देणे ही बाब अशोभनिय असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. एडीसीसी इंफोकॅड प्रा.लि.च्या प्रकरणावर स्थायी समितीमध्ये निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी स्वाक्षरी केलेली फाईल २६ मे रोजी सायंकाळी स्थायी समितीकडे पाठविण्यात आली. ३१ मे रोजी स्थायी समितीची सभा होणार आहे. असे असतानाही स्थायी समितीकडे प्रकरण प्रलंबित असल्याची सांगण्यामागे आयुक्तांची नेमकी काय मानसिकता आहे, हे समजणे कठीण आहे. प्रत्यक्षात एबीपीएएस ही प्रणाली १ एप्रिल २०१५ पासूनच लागू व्हायला हवी होती. मात्र आयुक्तांच्या चालढकल भूमिकेमुळेच या मंजुरीसाठी जवळपास वर्ष लोटल्याचा आरोप लहामगे यांनी केला आहे. स्थायी समितीपुढे यापूर्वीच यायला हवे असणारे हे प्रकरण निव्वळ त्यांच्या भूमिकेमुळेच २६ मे रोजी पोहोचले आहे. यात स्वत: दोषी असतानाही स्थायी समितीच्या सदस्यांनाच या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न ते करीत असून या प्रकरणाआडून ते मनपात राजकारण करेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)