शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ५४ कोटी अखर्चित

By admin | Updated: April 11, 2015 00:53 IST

शासनाकडून निधी मिळत नसल्याच्या थापा मारत विकास कामांना ब्रेक देणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बिंग फुटले आहे.

विकास कामे ठप्प : निधी नसल्याची बोंब ; प्रत्यक्षात मात्र कामेच नाहीचंद्रपूर : शासनाकडून निधी मिळत नसल्याच्या थापा मारत विकास कामांना ब्रेक देणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बिंग फुटले आहे. २०१४-१५ या वित्तीय वर्षात तब्बल ५३ कोटी ९७ लाख ४७ हजार रूपयाचा निधी अर्खीत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या वित्त समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी बांधकामावर किती निधी खर्च झाला, याची माहिती विचारली असता, ही माहिती समोर आली आहे. अच्छे दिनचे दिवास्वप्न दाखवत भाजप पदाधिकारी सत्तेच्या बोहल्यावर चढल्यानंतर प्रत्यक्षात मात्र चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी अखर्चीत ठेवल्याने जिल्हा परिषदेला बुरे दिन आले आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाचे विनोद अहिरकर व सतिश वारजूकर या जि.प. सदस्यांनी पत्रकाद्वारे केला आहे. ६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सुरु असताना २०१४-१५ या वित्तीय वर्षात बांधकामावरील किती निधी अखर्चीत आहे, याची माहिती विनोद अहीरकर यांनी सभागृहाला मागितली. त्यानंतर देण्यात आलेल्या माहितीत अखर्चीत निधीचा आकडा पाहता संपूर्ण सभागृह संतप्त झाले. बांधकामासाठी निधी नाही, अशी सतत ओरड होत असताना प्रत्यक्षात मात्र आलेला निधी वेळीच वापरता आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक विकास कामे झालेली नाही, असा आरोप विनोद अहिरकर व सतिश वारजूकर यांनी केला आहे.राज्याचे अर्थ व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वस्त असलेले देवराव भोंगळे हे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आहेत. मात्र त्यांनी प्रत्यक्षात कोट्यवधी रूपयांचा निधी अखर्चीत ठेऊन आपली अकार्यक्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांना उत्तर देताना भोंगळे यांची पंचाईत होत आहे. ५४ कोटींचा निधी अखर्चीत असताना देवराव भोंगळे यांनी मात्र परिक्षेत्रात कामे मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना निधी नाही, शासनाकडे पत्रव्यवहार सुरु आहे. निधी मिळाला की कामे देऊ अशा थापा मारल्या. मात्र आलेल्या निधीचे साधे नियोजन सुद्धा त्यांना करता आले नाही. त्यामुळे ५४ कोटींचा निधी अखर्चीत राहिला, असे जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर व सतिश वारजूकर यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्याचे वित्त मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याकरिता जादा निधीची तरतुद करीत आहेत. मात्र त्याचाच पक्षाचे जबाबदार सभापती निधी अखर्चीत ठेवत असल्याने जिल्ह्यात विकास कामांना खिळ बसल्याचे अहीरकर व वारजूकर यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाव्यतीरिक्त इतरही विभागात निधी अखर्चीत आहे. त्यामुळे विकास काम होऊ शकलेले नाही. यासंदर्भात बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)देवराव भोंगळे यांनी राजीनामा द्यावानिधी नाही अशा थापा मारत शासनाकडून मिळालेला ५४ कोटींचा निधी अखर्चीत ठेवणारे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर व विनोद अहिरकर यांनी केली आहे. सुरुवातीच्या काळात देवराव भोंगळे यांचा आव पाहता जिल्हा परिषदेच्या विकासात ते महत्त्वाची भूमिका बजावतील असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यांच्यासारखा खराब कार्यकाळ यापूर्वीच्या कोणत्याच बांधकाम सभापतीचा राहिला नाही, असा आरोपही विनोद अहीरकर व सतिश वारजूकर यांनी केला आहे.