शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात साकारणार अब्दुल कलाम वन उद्यान

By admin | Updated: August 6, 2015 02:00 IST

राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला बल्लारपूर रोड येथे

चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला बल्लारपूर रोड येथे महाराष्ट्र वन विकास महामंडळ व वन विभागाच्या प्रयत्नातून देशाचे माजी राष्ट्रपती ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वन उद्यान’ साकारण्यात येणार आहे. हा निर्णय वन विभागाच्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला महाराष्ट्र वन विकास महामंडाळाचे महाव्यवस्थापक एस. एस. डोळे, मुख्य वन संरक्षक संजय ठाकरे, विभागीय व्यवस्थापक एस. बी. पाटील, सहायक व्यवस्थापक व्ही. एस. शेलार, सहायक वन संरक्षक ए.के. बडकेलवार, सहायक वन संरक्षक व्ही.डब्ल्यू. मोरे, सहायक वनसंरक्षक कविटकर, सुहास अलमस्त, शैलेश बैस, सुभाष कासनगोट्टूवार व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला बल्लारपूर रोड येथे महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या २० हेक्टर जागेवर माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने वन उद्यान साकारणार आहे. या उद्यानात नेचर ट्रेल, पॅगोडा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संग्रहालय, प्राण्यांचे पूतळे, माहितीचे फलक, बालोद्यान, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, वन सफारीची व्यवस्था, कॅक्टस गार्डन, वॉटर फॉल, लक्ष्मण झुला, बांबू वन, आकर्षक प्रवेशद्वार ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा वॉकिंग ट्रॅक, फाऊंटन व सोलर दिवे आदी सुविधा असणार आहेत. उद्यानासाठी वन विभाग व डब्ल्यूसीएलचा सीएसआर निधी प्राप्त होणार आहे. या उद्यानाचे उद्घाटन १५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लहान मुलांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे उद्यान असावे, असा आग्रह पालकमंत्री यांचा आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संग्रहालय या उद्यानाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. (शहर प्रतिनिधी)