शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

अबब! चंद्रपूरातच 120 नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:40 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार २४४ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ३५१ झाली आहे. सध्या १४८० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ५९ हजार ८९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख २७ हजार ९१६ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे२७६ रुग्णांची नव्याने भर : ॲक्टीव्ह रुग्णसंख्या दीड हजाराच्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोराेनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट करत आहे. गेल्या २४ तासात २७६ नव्या कोरोना रुग्णांची भर भडली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर महानगरात तब्बल १२० रुग्णांची भर पडली आहे. सोबतच ॲक्टीव्ह कोरोना रुग्णांचा आकडा दीड हजारांच्या घरात पोहचला आहे. ही संख्या १ हजार ४८० इतकी झाली आहे. १०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली ही बाब दिलासा देणारी आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार २४४ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ३५१ झाली आहे. सध्या १४८० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ५९ हजार ८९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख २७ हजार ९१६ नमुने निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ४१३ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. 

चंद्रपूर व वरोरा झाले कोरोनाचे हाॅटस्पाटकोरोनाची लाट कमी होत असताना नव्या वर्षात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. या दुसऱ्या लाटेत चंद्रपूर महानगरासह वरोऱ्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढत आहे. ही रुग्णसंख्या बघता हे दोन्ही शहरे कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाल्याचे दिसून येत आहे.

सात दिवसात चंद्रपूरात ४२१ नवे रुग्णगेल्या सात दिवसात चंद्रपूर शहरात तब्बल ४२१ नव्या रुग्णांची भर पडली. दररोज येणाऱ्या अहवालात चंद्रपूर शहरातील रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. या पाठोपाठ वरोरा शहराचा क्रमांक लागतो. सात दिवसात वरोरा तालुक्यात ११० रुग्ण वाढले आहे. 

पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्षजिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच होळी व रंगपंचमी उत्सव आल्याने बाजारात प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्स समितीची गुरूवारी बैठक होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे सर्व उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याने याकडे नागरिकांचे लक्ष आहे. 

जिल्ह्यात तीन दिवसांपुरताच लससाठाजिल्ह्यात ६९ केंद्र व चंद्रपूर मनपा अंतर्गत सात केंद्रातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र, सध्या सुमारे कोविडशिल्डचे २५ हजार डोस उपलब्ध असल्याने नवीन डोसची प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. मनपा क्षेत्रात आतापर्यंत २३ हजार ३३७ जणांनी डोस घेतला. गर्दी लक्षातून दोन केंद्र सुरू करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, लससाठा उपलब्ध नसल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. लससाठा मर्यादा असल्याने जिल्ह्यातही असेच चित्र आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या