शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांना मिळणार जलदगतीने ‘आधार’

By admin | Updated: August 13, 2015 01:44 IST

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी यापुढे निराधार समितीच्या किमान आठ बैठकी ....

तहसीलदारांवर जबाबदारी : वर्षातून आठ बैठकी घेण्याचे आदेश चंद्रपूर : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी यापुढे निराधार समितीच्या किमान आठ बैठकी वर्षभरात ठरवून दिलेल्या तारखेला घेण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होऊन निराधारांना प्रशासनाचा आर्थिक आधार मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतून निराधार व्यक्तींना दरमहा निश्चित वेतन देण्यात येते. मात्र, या योजनेतून लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर दोन ते तीन वर्षानंतरही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्रत्येक तहसील कार्यालयात दाखल होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक निराधारांना त्रास सहन करावा लागतो. दाखल होत असलेल्या तक्रारींचे निरासन करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय विभागाने ४ आॅगस्ट रोजी नवा निर्णय घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यापुढे वर्षभरात निराधार समितीच्या आठ बैठकी निश्चीत केलेल्या तारखेच्या दिवशी घेण्याचे आदेश काढण्यात आले आहे. जाहीर केलेल्या तारखेच्या दिवशी शासकीय सुटी किंवा अन्य रजा येत असल्यास या तारखेच्या पूर्वीच्या किंवा नंतरच्या तीन दिवसांची तारीख निश्चीत करण्याचे आदेशात नमूद आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बैठकीस गैरहजर राहिल्यास किंवा उपस्थिती दर्शविण्यास असर्मथता दाखविल्यास तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठका घेण्याचे आदेश म्हटले आहे. त्यामुळे अनेक प्रकरणे लवकर निकाली निघतील. (स्थानिक प्रतिनिधी)या दिवशी होणार बैठकीचे आयोजनराज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती (३ जानेवारी), सावित्रीबाई फुले पुण्यतिथी (१० मार्च), महात्मा जोतिबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (११ ते १४ एप्रिल), रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी (२७ मे), राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस (२६ जून), स्वातंत्र्यदिन (१५ आॅगस्ट), महात्मा गांधी जयंती (२ आॅक्टोबर) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) या दिवशी बैठक घेण्याचे आदेशात नमूद आहे. तहसीलदारांवर जबाबदारीसामाजिक न्याय विभागाने दिलेल्या तारखेस बैठक घेण्याची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. बैठक न झाल्यास तहसीलदारांना जबाबदार धरण्यात येणार आहे. पारदर्शकता राहावी यासाठी बैठकीचे चित्रीकरण करण्यात करण्याचे निर्देश आहेत.