शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

आधार यंत्रणा झाली निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:33 IST

शासकीय कामकाजासाठी व योजनांसाठी सक्तीचे करण्यात आलेले आधार कार्ड कोरपना तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

तालुक्यातील आठही केंद्र बंद : नागरिक आधाराच्या प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : शासकीय कामकाजासाठी व योजनांसाठी सक्तीचे करण्यात आलेले आधार कार्ड कोरपना तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नोंदणी होऊनही आधार कार्ड बनले नसून नवीन नोंदणी किंवा सुधारणा करणेही बंद आहे. तालुक्यात आठ आधार केंद्र असूनसुद्धा दैनंदिन व्यवहाराकरिता पर्वणी ठरणारे आधार कार्ड आता मात्र निराधार झाल्याचे दिसून येत आहेत. आधार कार्डबाबत जिल्हा प्रसाशनाने प्रारंभी सकारात्मक पावले उचलली होती. मात्र आता ते अशा प्रकारापासून अनभिज्ञ आहे. तालुक्यात तीन शहरे व ११० गावे यांची अंदाजे लोकसंख्या एक लाख २१ हजार ४७९ आहे. यातील कित्येक लोकांकडे अजूनही आधार कार्ड नाहीत. गेल्या एक महिन्यापासून आधार कार्ड का बनत नाही, याचे उत्तर जिल्हा प्रशासन आणि यू.आय.डी विभागाकडे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सर्व स्तरावर जनतेला जगण्याचा परवाना ठरलेल्या आधार कार्ड तयार करणारी यंत्रणा मागील एक महिन्यांपासून कोमात गेल्याने तालुक्यातील हजारो नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आधार कार्ड नाही, शिवाय आॅनलाईन यंत्रणाही कुचकामी ठरत असल्याने विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना आता व्यवहार कसा करावा, या चिंतेने ग्रासले आहेत.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली तक्रार यंत्रणा सज्ज केली आहे. हॅलो चांदा नावाची हेल्प लाईन सुरु केली आहे. या यंत्रणेमुळे तरी नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.विद्यार्थ्यांची गैरसोयशाळेत नवीन अडमिशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड असणे सक्तीचे केले आहे. तसेच गणवेशाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे असल्याने तिथेही आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने बँक खाते उघडण्यात अडचणी निर्माण होत आहे.याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांनासुद्धा सहन करावा लागत आहे. तालुक्यात आठ आधार कार्ड केंद्र आहेत. बऱ्याचशा खेडेगावातील नागरिकांनी आजही आधार कार्ड काढलेले नाही. विविध शासकीय योजनांकरिता आधार कार्ड सक्तीचे असल्याने अनेक लाभार्थी लोकांना आज आधार कार्डची आवश्यकता आहे. मात्र आधार सेवा बंद असल्याने त्यांना आधार केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सरकारने आधार आणि पॅन लिंकवर सध्या भर दिला आहे. परंतु कित्येक नागरिकांच्या पॅन कार्डवर नावाच्या आणि जन्म तारखेच्या चुका आहेत. त्या सुरळीत करण्याकरिता आधार कार्ड आवश्यक आहेत. आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे आधार व पॅन लिंकिंगचे कामसुध्दा ठप्प पडले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेशासनाने जवळपास सर्वच व्यवहाराकरिता आधार कार्ड सक्तीचे केले आहे. तालुक्यातील आठ केंद्रामार्फत आधार कार्ड बनविण्याचे काम थांबले असून नागरिकांची इकडून तिकडे भटकंती सुरू आहे. जातीचे दाखले, बँकेचे केव्हायसी फार्म, राशन कार्ड, गॅस कनेक्शन याशिवाय इतर विविध शासकीय योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक झाले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांंनी स्वत: याकडे लक्ष देऊन नागरिकांना आधार द्यावा, अशी मागणी आहे.