शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर हॉस्पिटलसाठी ४० कोटींचा प्रस्ताव पाठवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

चंद्रपूर येथे निर्माणाधीन असलेले कँसर हॉस्पिटलमध्ये १४० बेड असून, २ लक्ष ३५ हजार चौरस फुटांत बांधकाम होणार आहे. रुग्णालयाची इमारत ही तळमजल्यासह पाच मजली राहणार आहे. खनिज विकास निधीतून आतापर्यंत ११३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले असून, सिव्हिल वर्कवर ४० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती वैभव गजभिये यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर रोडवर निर्माणाधीन असलेल्या कँसर हॉस्पिटलची जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहणी करून बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बांधकाम प्रकल्प अधिकारी वैभव गजभिये, लेखाधिकारी मयुर नंदा आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, टाटा ट्रस्टच्या सहाकार्याने येथील कँसर हॉस्पिटल उभे राहत असले तरी भविष्यात वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आदी बाबतीत ते व्यवस्थित सुरू राहिले पाहिजे. आपल्या जवळच असलेल्या नागपुरात मोठमोठे कँसर हॉस्पिटल आहेत. मात्र, गरीब लोकांना तेवढा खर्च झेपत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांचा विचार करून या हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार होणे गरजेचे आहे. हे रुग्णालय संपूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी आतापासून नियोजन करून  रुग्णालयासाठी लागणारा ४० कोटींचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवावा, असेही ते म्हणाले.

अशी असेल व्यवस्था - चंद्रपूर येथे निर्माणाधीन असलेले कँसर हॉस्पिटलमध्ये १४० बेड असून, २ लक्ष ३५ हजार चौरस फुटांत बांधकाम होणार आहे. रुग्णालयाची इमारत ही तळमजल्यासह पाच मजली राहणार आहे. खनिज विकास निधीतून आतापर्यंत ११३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले असून, सिव्हिल वर्कवर ४० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती वैभव गजभिये यांनी दिली.

 

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटल