शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

४७ ग्रामपंचायतीसाठी ८५१ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: July 30, 2015 01:04 IST

सावली तालुक्यात एकूण ४७ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ४७ ग्रामपंचायतीसाठी ८५१ उमेदवार आपले नशिब अजमावत आहे.

सावली : सावली तालुक्यात एकूण ४७ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ४७ ग्रामपंचायतीसाठी ८५१ उमेदवार आपले नशिब अजमावत आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यापासून डमी मतपत्रिका छापण्यापासूनचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे गावागावात निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे.तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रचार मोहीम चरण सीमेवर आतापासूनच पोहचली आहे. ४ आॅगस्टला होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक गावात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी शेतकरी बांधवात कमालीचे नैराश्य जाणवत आहे. गेवरा खुर्द, कढोली व पारडी या तीन ग्रामपंचायत अविरोध झाल्या आहेत. कढोली आणि गेवरा खुर्द येथे महिला सरपंच होणार आहेत. त्यामुळे २२ महिला सरपंचासाठी मतदान होणार आहे. शेतीच्या हंगामातच निवडणुका आल्याने उमेदवारांची दमछाक होण्याची चिन्हे दिसत आहेत. पाऊस नसल्याने एकीकडे शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. तर उमेदवारांच्या रणधुमाळीने काही मतदारांमध्ये उत्साह संचारला आहे.भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप, रिपाई, बसपा या सर्व पक्षांनी निवडणुकीत उडी घेतली तरी स्थानिक पातळीवर भाजपा-काँग्रेस, भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच रिपाई, बसपा, भारिप यासारख्या पक्षांचीही काही गावात अंतर्गत युती झाली आहे. अच्छे दिन ची वाट एक वर्षापासून पाहून थकलेल्या आणि मागच्या वर्षीचा हंगाम बुडूनही शासनाकडून काही मदत मिळाली नाही. त्यामुळे याचा दुष्परिणाम या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ५० ग्रामपंचायतीच्या ४२० सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. मात्र तीन ग्रामपंचायत आणि एकुण ६२ सदस्य अविरोध निवडून आल्याने ३५६ सदस्यांसाठी निवडणूक घेतली जात आहे.त्याकरिता ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. दोन ग्रामपंचायतीची पोट निवडणूक असताना एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरले नसल्याने तेथील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. दारूबंदीच्या काळात अनूचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासन व निवडणूक विभाग सतर्क झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)