शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन वनक्षेत्र घोषित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 17:03 IST

संरक्षित व असंरक्षित अशी कोणतीही वर्गीकृत न झालेली विदर्भातील ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन वन विभागाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ठळक मुद्देअधिसूचनाची कार्यवाही सुरूनागपूर, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक अवर्गीकृत जमीन

लोकमत न्यूज नेटवर्कराजेश मडावीचंद्रपूर : संरक्षित व असंरक्षित अशी कोणतीही वर्गीकृत न झालेली विदर्भातील ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन वन विभागाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक जमिनीचा समावेश असून येत्या काही महिन्यांमध्ये सदर जमीन वनक्षेत्र म्हणून घोषित होणार आहे.२०१७-१८ व २०१८-१९ वर्षात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संरक्षित व असंरक्षित जमीन किती आहे, याची माहिती संकलीत करण्याचे काम वन विभागाने सुरू केले होते. दरमयान, या कामात काही प्रशासकीय अडचणी आल्यामुळे अहवाल तयार करण्यास विलंब झाला होता. भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम ४ व कलम २० अंतर्गत संरक्षित व असंरक्षित अशा प्रकारे वर्गीकरण न झालेली जमीन वन विभाग ताब्यात घेऊ शकते, अशी तरतूद आहे. त्यामुळे वन विभागाने सदर माहिती संकलनाचे काम गतिमान करून अंतिम अहवाल तयार केला. या अहवालात ५३ हजार ४९१ हेक्टर जमिनीची तफावत असल्याचे नमूद केले आहे. भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम ४ अंतर्गत २०१४-१५ ते जुलै २०१९ पर्यंत राज्यात २ लाख ७ हजार २९१. ९९ हेक्टर आणि कलम २० अंतर्गत १ लाख ३४ हजार ८५२ हेक्टर जमीन अवर्गीकृत व असंरक्षित जमीन म्हणून अधिसूचित झाली आहे. त्यामध्ये विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर व गडचिरोली सर्कलमधील ८४ हजार ४८६ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. वन कायद्याच्या तरतुदीनुसार प्रशासकीय कार्यवाही करून सदर जमीन वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी वन विभागाकडून अधिसूचित करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे.प्रधान मुख्य वनसंरक्षकांना अहवाल सादरसंरक्षित व असंरक्षित अशी कोणतीही वर्गीकृत न झालेल्या जमिनीचा अंतिम अहवाल राज्याचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे नुकताच सादर केला आहे. या अहवालात नागपूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर व गडचिरोली सर्कलमधील ८४ हजार ४८६ हेक्टर जमिनीची माहिती नोंदवली आहे. भारतीय वन कायदा १२२७ च्या तरतुदीचा आधार घेऊन यापूर्वी हजारो हेक्टर झुडपी जंगल ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती, हे विशेष. 

टॅग्स :forest departmentवनविभाग