शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी तलावात आठ टक्केच पाणी

By admin | Updated: August 14, 2015 01:20 IST

सिंदेवाही तालुक्यात कुठलाही मोठा उद्योग नसल्याने नागरिक संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे.

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यात कुठलाही मोठा उद्योग नसल्याने नागरिक संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. येथील शेती ही घोडाझरी या एकमेव तलावावर अवलंबून असून तलावामध्ये केवळ आठ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झालेला आहे.नवरगाव परिसराचा विचार केल्यास ९५ टक्के शेती ही घोडाझरी या एकमेव तलावावर अवलंबून असून आॅगस्ट महिना अर्धा होत आला तरी केवळ आठ टक्के जलसाठा तलावात आहे. या तलावावर ६ हजार ८०० हेक्टर शेतजमिनीचे सिंचन अवलंबून आहे. या परिसरात धानाचे मुख्य पीक असून आर्थिक व्यवस्था शेतीवरच निर्भर आहे. दरवर्षी १५ आॅगस्टच्या आसपास घोडाझरी कालव्याचे पाणी या परिसरात येत होते. परंतु आठ टक्केच पाणी असल्याने आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घोडाझरी तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकऱ्यांनी रोवणीच केलेली नाही, हे विशेष.निसर्गानेही यावर्षी दगा दिला असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. पाऊस नसल्याने धान पऱ्ह्याची काही शेतकऱ्यांनी दुबार- तिबार पेरणी केली. यासाठी विविध संस्था, खासगी सावकाराकडून कर्जही घेतले. परंतु निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी पूर्णत: खचलेला आहे.गोसीखुर्द धरणाचे पाणी या परिसरात आणणार, असा गाजावाजा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला. परंतु आज शेतकऱ्यांवर गोसीखुर्दच्या पाण्याची नितांत गरज असतानासुद्धा ते मिळू शकलेले नाही. परंतु गोसीखुर्दचे पाणी मिंडाळा ब्रॅचमधून उपसा सिंचन योजनेद्वारे घोडाझरी तलावात आणणे व शेतकऱ्यांना पुरवठा करणे शक्य आहे. त्यासाठी शासनाने, राजकीय पुढाऱ्यांनी, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ही योजना शक्य झाल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना पहिले धानाच्या रोवणीसाठी व पीक घेण्यास लाभदायक ठरणार आहे. नाही तर शेतकरी हा आर्थिकदृष्टया पुन्हा कमकुवतच होणार आहे.घोडाझरी सिंचाई शाखेच्या अंतर्गत पुन्हा पाच मालगुजारी तलाव आहेत. परंतु त्यांचीही परिस्थिती तशीच आहे. केवळ गिरगाव येथील मालगुजारी तलावात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून इतर चार तलावात निघणारे पाणी शुन्य आहे. या परिसरातील तलाव, खासगी बोड्या यासुद्धा कोरड्याच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर आहे.घोडाझरी सिंचाई शाखा नवरगाव येथील शाखा अभियंत्याचे पद मागील चार- पाच महिन्यापासून खाली असून येथील अतिरिक्त पदभार गोविंदपूर येथील शाखा अभियंता ए.एस. यादव यांच्याकडे आहे. दरवर्षी पावसापूर्वी कालव्याच्या दुरुस्तीची कामे केली जात होती. मात्र यावर्षी कामेच झाली नाहीत. समजा घोडाझरी तलावाला पाणी आले आणि सोडण्याचा प्रसंग आला तरी कालव्याच्या दुरुस्तीअभावी पाण्याचे वितरण करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. इंग्रजांच्या काळापासून नवरगाव शाखेची इमारत असून ही इमारत कालबाह्य झालेली आहे. पावसात कार्यालय गळते. त्यामुळे अधिकारी येथे राहात नाहीत. विशेष म्हणजे, लगतच जागा असून त्यावर क्वार्टर बांधले तर अधिकारी येथेच राहतील आणि शेतकऱ्यांच्या सोईचे होईल.एकूण शेतकरी हा निसर्गाकडून नागविला गेला असून आता रोवणी करणेही शक्य राहिले नाही. त्यामुळे तो मोठ्या विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आशा उंचावण्यासाठी गोसीखुर्दचे पाणी घोडाझरीत टाकून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. (वार्ताहर)