शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

७६ गावांत पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: January 3, 2015 00:54 IST

२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले.

मंगेश भांडेकर चंद्रपूर२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या भूजल पातळीवर झाला आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सप्टेंबर २०१४ पर्यंत ०.०६ मीटरने घटली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रामधील तब्बल ७६ गावांत उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचे संकेत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणी टंचाई आराखडे तयार करण्याकरीता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरीता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरिक्षण विहिरीतील मान्सूनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या अभ्यासाच्या आधारे संभाव्य पाणी टंचाईचा प्राथमिक तांत्रिक अहवाल तयार करून टंचाईग्रस्त गावांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येते. या अहवालाच्या आधारेच पाणी टंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सहकार्याने पाणी टंचाई कृती आराखडा आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असे तीन टप्यात तयार करण्यात येते. पहिल्या टप्यातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून यात ७६ गावांत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ११४४३ चौ.किमी आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता व वर्धा नदी खोऱ्यात समाविष्ट असलेल्या ५८ पाणलोट क्षेत्रामधील ४०० लघु पाणलोट क्षेत्रातील १३४ विहिरींचे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निरीक्षण करण्यात आले. यात मागील पाच वर्षातील आॅक्टोबर महिन्यामधील पाणी पातळी २.६६ मीटर सरासरीच्या तुलनेत यावर्षी घट होऊन २.६० मीटर पाणी पातळी झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसाधारण हवामान विषम असते. दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्व दिशेने वाहणारे मौसमी वारे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये (मान्सून कालावधी) बरसात करतात. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ११४२.०७ मिमी आहे. मात्र, २०१४ च्या मान्सून कालावधीत सरासरी ७३.४६ टक्के पर्जन्यमानापेक्षा २६.५३ टक्के कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील ७६ गावांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.