शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

६ वर्षात ७५१ नोंदणी विवाह

By admin | Updated: April 25, 2015 01:23 IST

लग्न हे मंगल कार्य. मात्र या मंगल कार्यात मोठ्या प्रमाणात पैश्याचा अतिरिक्त अपव्यय होतो.

लोकमत विशेषमंगेश भांडेकर चंद्रपूरलग्न हे मंगल कार्य. मात्र या मंगल कार्यात मोठ्या प्रमाणात पैश्याचा अतिरिक्त अपव्यय होतो. त्यातच गरीब कुटुंबाला तर खर्च आवाक्याबाहेरचा असतो. याला चंद्रपूर जिल्ह्यातील जोडप्यांनी आडफाटा दिला असून गेल्या सहा वर्षांत तब्बल ७५१ जोडप्यांचे नोंदणी पद्धतीने ‘शुभमंगल’ उरकण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीला तिलांजली देत आणि खर्च होणारा पैसा आणि श्रम यावर या नोंदणी विवाहाने आळा बसला, हे विशेष! लग्न ठरले की लग्नाच्या तयारीला वेग येतो. लग्नपत्रिका, खरेदी, लग्नमंडपाची सजावट, अशा प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते. लग्नाचा दिवस उजाडेपर्यंत कुटुंबातील सगळेच जण कामात व्यस्त असतात. नियोजन केल्याप्रमाणे सगळे काही व्यवस्थीत पार पडले, की झाले एकदाचे लग्न असे म्हणत, सुटकेचा नि:श्वास सोडला जातो. मात्र यात होणारी धावपळ, खर्च हे आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गरिब कुटुंबाचे तर लग्न कार्य म्हटले की, तोडांवरचे पाणी पळते. मात्र या सर्व धडपडीतून नोंदणी विवाहामुळे सुटका मिळू शकतो. विशेष विवाह कायद्यानुसार केला जाणारा विवाह म्हणजे नोंदणी पद्धतीचा विवाह. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे ही नोंदणी करता येते. हा विवाह करण्यापूर्वी एक नोटीस द्यावे लागते. विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे नोटीस देण्यासाठीचा अर्ज मिळतो. नोटीस संबंधित विवाह नोंदणी कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध केला जातो.३० दिवस हे नोटीस कार्यालयाच्या सूचना फलकावर लावले जाते. या दरम्यानच्या काळात या विवाहावर कोणीही आक्षेप नोंदविले नाही, तर पुढील ६० दिवसांमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. विवाह निबंधक कार्यालयात विवाह अधिकारी वधू-वर यांना तीन साक्षीदारांच्या समोर विवाहाची शपथ देतात. त्यानंतर संबंधित विवाह झाल्याची नोंद विवाह नोंदणी पुस्तिकेत करतात व वधू-वरांच्या स्वाक्षरी घेऊन विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर विवाह अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊन लगेच विवाह प्रमाणपत्र वधू-वरांना दिले जाते. नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक वैदिक पद्धतीने किंवा कोणत्याही धार्मिक पद्धतीने लग्न झाले असले, तरी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असल्याशिवाय न्यायालयाच्या दृष्टीने हा विवाह ग्राह्य धरला जात नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे अतिशय महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. लग्न झाल्याचा पुरावा म्हणून या कागदपत्राचे महत्त्व आहेच; पण विविध सरकारी कागदपत्रे काढण्यासाठीही या प्रमाणपत्राचा उपयोग होतो.