शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात ७४ प्रकरणात दंडाची वसुली

By admin | Updated: November 26, 2015 00:56 IST

तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण मिळविण्यासाठी तहसील प्रशासन प्रयत्नरत आहे.

तहसीलदारांची कारवाई : सहा लाखांवर केला महसूल जमाबल्लारपूर : तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण मिळविण्यासाठी तहसील प्रशासन प्रयत्नरत आहे. आजतागायत बल्लारपूर तालुक्यात ७४ प्रकरणात दंडात्मक कारवाई करुन तब्बल ६ लाख २९ हजार ९४० रुपये महसूल शासनाकडे जमा केल्याची माहिती बल्लारपूरचे तहसीलदार डी. एस. भोयर यांनी ‘लोकमत’ला दिली.बल्लारपूर तालुका लहान असून १७ ग्रामपंचायतीत ३२ गावांचा समावेश आहे. महसूल प्रशासनाचे प्रयत्न अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याचे आहे. त्यामुळे नियमित व परवानगीच्या रुपात तब्बल १४ लाख २९ हजार ४५२ रुपये तालुक्यातून जमा करुन शासनाच्या तिजोरीत जमा केले आहे. अवैध रेती वाहतूकधारकांवर आॅक़्टोबर महिन्याअखेर ५३ प्रकरणांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यातून तहसील प्रशासनाला ४ लाख ४३ हजार १६० रुपयांचा दंड वसूल करता आला.त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात तहसील प्रशासनाने धडक मोहिम राबविली. यामुळे अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन कमाई करणाऱ्याचे धाबे दणाणले. या महिन्यात २१ जणावर दंडाची कारवाई केली. यामुळे महसूल विभागाला एक लाख ८६ हजार ७८० रुपये मिळाले. आजतागायत तहसील प्रशासनाने गौण खनिजाच्या उत्खननाच्या माध्यमातून २० लाख ५९ हजार ६१२ रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचे काम केले आहे. अवैध रेती वाहतूक दारावर आळा घातल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे, असेही तहसीलदार भोयर यांनी सांगितले. बल्लारपूर तालुक्यात अवैध रेतीच्या बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत, यावर विचारणा केली असता भोयर म्हणले, आम्ही अवैध रेती उत्खननावर लक्ष केंद्रीत केले आहे. वृत्त वस्तुस्थिला धरुन प्रकाशित केले जात नाही.परिणामी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे मानसिक बळ खचते. याचा काम करतेवेळी त्रास होतो. अवैध रेती उत्खनन तालुक्यातून बंद करण्याची तयारी असून तालुक्यातील केबल चालकांनी नियमित वसुली न दिल्यास कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)