शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपयांत उरकले ७२४ जोडप्यांनी लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

चंद्रपूर : विवाह सोहळ्यात वारेमाप खर्च करण्याच्या पद्धतीला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील ७२४ जोडप्यांनी २०० रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह ...

चंद्रपूर : विवाह सोहळ्यात वारेमाप खर्च करण्याच्या पद्धतीला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील ७२४ जोडप्यांनी २०० रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

विवाह सोहळा सदैव स्मरणात राहावा, यासाठी नवदाम्पत्य हजारो आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवीत लग्नात वारेमाप खर्च करतात. मात्र, कोरोनाने विवाह सोहळ्याची परिभाषाच बदलविली आहे. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे निर्देश प्रशासनाचे असल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या या संकटात २०२० मध्ये ४०५ जोडप्यांनी, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांना विवाहासाठी १५० रुपये मॅरेज फी व ५० रुपये नोंदणी फी असा केवळ २०० रुपयांचा खर्च आला.

बॉक्स

कधी किती झाले नोंदणी विवाह

कठीण काळात घेतला बचतीचा निर्णय

२०१८ ३४०

२०१९ ४३०

२०२० ४०५

२०२१ जानेवारी ६५

२०२१ फेब्रुवारी ७८

२०२१ मार्च ५९

२०२१ एप्रिल ४१

२०२१ मे २६

२०२१ जून ५०

बॉक्स

२०२१ मध्ये नोंदणी वाढली

दरवर्षी जिल्ह्यात ३०० च्या जवळपास नोंदणी पद्धतीने विवाह सोहळे पार पडत होते. सन २०२० मध्ये जिल्ह्यात ४०५ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. कोरोनाने सार्वजनिक विवाह सोहळ्याला निर्बंध असल्याने गरीब, सर्वसामान्यांसह नोकरदार व मोठ्या घराण्यातसुद्धा नोंदणी विवाहाला पसंती दिली आहे.

------

कोट

मागील वर्षीपासून कोरोनाचे सावट आहे. यामध्ये जिल्ह्यातील युवकाचा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे कल आहे. दीड वर्षात ७२४ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले आहेत.

बी. एन. माहोरे विवाह अधिकारी, चंद्रपूर

-------

बॉक्स

ऑनलाइन ॲप्लिकेशन गरजेचे

नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. यावेळी वधू आणि वरांनी वयाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. संपूर्ण कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर अर्ज केलेल्या दिवसापासून ३० दिवसांनंतर आणि ९० दिवसांच्या आत लग्नाची तारीख दिली जाते. त्या दिवशी दोघांकडील साक्षीदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष विवाह पार पडतो.

------

बॉक्स

केवळ २०० रुपये खर्च

वधू आणि वर हे दोघेही जर जिल्ह्यातीलच असतील, तर ५० रुपये नोंदणी शुल्क व १५० रुपये मॅरेज शुल्क असा दोनशे रुपयांचा, तर वर किंवा वधू दोघांपैकी एखादा जिल्ह्याबाहेरील असेल तर नोंदणी शुल्क १०० रुपये व मॅरेज शुल्क १५० असा २५० रुपयांचा खर्च येतो. नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.