शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दोनशे रुपयांत उरकले 724 जोडप्यांनी लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

विवाह सोहळा सदैव स्मरणात राहावा, यासाठी नवदाम्पत्य हजारो आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवीत लग्नात वारेमाप खर्च करतात. मात्र, कोरोनाने विवाह सोहळ्याची परिभाषाच बदलविली आहे. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे निर्देश प्रशासनाचे असल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या या संकटात २०२० मध्ये ४०५ जोडप्यांनी, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

ठळक मुद्देकोरोना संकटात नोंदणी विवाहाला अधिक पसंती

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विवाह सोहळ्यात वारेमाप खर्च करण्याच्या पद्धतीला फाटा देत  कोरोना संकटकाळात जिल्ह्यातील ७२४ जोडप्यांनी दोनशे रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह करून नवा आदर्श निर्माण केला आहे.विवाह सोहळा सदैव स्मरणात राहावा, यासाठी नवदाम्पत्य हजारो आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवीत लग्नात वारेमाप खर्च करतात. मात्र, कोरोनाने विवाह सोहळ्याची परिभाषाच बदलविली आहे. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे निर्देश प्रशासनाचे असल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या या संकटात २०२० मध्ये ४०५ जोडप्यांनी, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांना विवाहासाठी १५० रुपये मॅरेज फी व ५० रुपये नोंदणी फी असा केवळ २०० रुपयांचा खर्च आला.  विशेष म्हणजे, यापुढीलही काळामध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास लग्न असलेल्या घरच्या कुटुंबावर  विशेषत: मुलीच्या वडीलांना येणारा आर्थिक  तसेच मानसिक ताण कमी करता येईल.

२०२१ मध्ये नोंदणी वाढली

दरवर्षी जिल्ह्यात ३०० च्या जवळपास नोंदणी पद्धतीने विवाह सोहळे पार पडत होते. सन २०२० मध्ये जिल्ह्यात ४०५ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. कोरोनाने सार्वजनिक विवाह सोहळ्याला निर्बंध असल्याने गरीब, सर्वसामान्यांसह नोकरदार व मोठ्या घराण्यातसुद्धा नोंदणी विवाहाला पसंती दिली आहे.

ऑनलाईन अप्लीकेशन गरजेचेनोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. यावेळी वधू आणि वरांनी वयाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. संपूर्ण कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर अर्ज केलेल्या दिवसापासून ३० दिवसानंतर आणि ९० दिवसांच्या आत लग्नाची तारीख दिली जाते. त्या दिवशी दोघांकडील साक्षीदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष विवाह पार पडतो.

केवळ २०० रुपये खर्चवधू आणि वर हे दोघेही जर जिल्ह्यातीलच असतील, तर ५० रुपये नोंदणी शुल्क व १५० रुपये मॅरेज शुल्क असा दोनशे रुपयांचा, तर वर किंवा वधू दोघांपैकी एखादा जिल्ह्याबाहेरील असेल तर नोंदणी शुल्क १०० रुपये व मॅरेज शुल्क १५० असा २५० रुपयांचा खर्च येतो. नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.

मागील वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. यामध्ये जिल्ह्यातील युवकांचा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे कल आहे. दीड वर्षात ७२४ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले आहेत.-बी. एन. माहोरे विवाह अधिकारी, चंद्रपूर 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या