शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गायीच्या पोटातून निघाला ७२ किलो प्लास्टीक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:20 IST

चंद्रपूर : नागरिकांच्या चुकीमुळे मुक्या प्राण्यांचे नाहक बळी जात आहे, अशीच घटना बापट नगर परिसरात घडली. एका नऊ महिने ...

चंद्रपूर : नागरिकांच्या चुकीमुळे मुक्या प्राण्यांचे नाहक बळी जात आहे, अशीच घटना बापट नगर परिसरात घडली. एका नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती मृत गायीच्या पोटात प्लास्टीक कचरा अडकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी केली असता, तिच्या पोटातून तब्बल ७२ किलो प्लास्टीक कचरा काढण्यात आला.

बापटनगर परिसरातील एक गाय तडफडत असल्याची माहिती येथील रहिवासी अकबर खान यांनी प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी दिली. सदस्य घटनास्थळी दाखल झाले. गायीची तडफड अधिकच असल्याने त्वरित औषधोपचार करण्यात आला. शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. मात्र, तिचा मृत्यू झाला. दरम्यान, उत्तरीय तपासणी करण्यात आली असता, तिच्या पोटातून ७२ किलो प्लास्टीक कचरा, तसेच नऊ महिने पूर्ण झालेले मृत पिलू काढण्यात आले. या घटनेमुळे प्यार फाउंडेशनच्या सदस्यांसह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. नागरिकांची चूक मुक्या पाण्यांच्या जीवावत बेतत आहे. त्यामुळे सावध होऊन प्लास्टीक वापर टाळावा, मुक्या प्राण्यांना वाचवावे, असे आवाहन फाउंडेशनच्या सदस्यांनी केले आहे.

बाॅक्स

पर्यावरण संवधनाचे काय?

राज्यात प्लास्टीकबंदी असली, तरी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात या बंदीचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. बाजार, तसेच इतर सर्वत्र व्यावसायिक ग्राहकांना प्लास्टीक देत असून, सुविधेसाठी ग्राहक निमूटपणे ते घेऊन जात आहे. मात्र, यामुळे पर्यावरण संवर्धनाचे काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

बाॅक्स

...तर अन्नत्याग आंदोलन

प्लास्टीकबंदी आहे. मात्र, ही बंदी केवळ कागदावरच आहे. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पशु-पक्ष्यांचा नाहक बळी जात आहे. मुके जनावरे प्लास्टीक खात असून, त्यांचा यामुळे नाहक बळी जात आहे. नागरिक, तसेच प्रशासनाची चूक असतानाही बळी. मात्र, मुक्या जनावरांचा जात आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावावे, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल.

देवेंद्र रापेल्ली, अध्यक्ष प्यार फाउंडेशन, चंद्रपूर

कोट

मानवांच्या चुकीमुळे मुक्या जनावरांचा नाहक बळी जात आहे. नागरिकांनी प्लास्टीक वापरू नये, बाहेर फेकू नये. गर्भवती मृत गायीची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यामध्ये तिच्या पोटातून ७२ किलो प्लास्टीक कचरा काढण्यात आला, अशा घटना टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे.

-डाॅ.पी.डी. कडूकर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, विभाग चंद्रपूर