शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७१९ गुरुजी सापडले अडचणीत

By admin | Updated: March 9, 2016 02:06 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागावर अवकळा ओढवली आहे. यात विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमालिची घटत आहे. परिणामी शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा आकडाही फुगला आहे.

कोरपना तालुक्यात ८८ शिक्षक अतिरिक्त : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वास्तवअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरजिल्हा परिषद शिक्षण विभागावर अवकळा ओढवली आहे. यात विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमालिची घटत आहे. परिणामी शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा आकडाही फुगला आहे. या विभागात उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर विषय शिक्षक आणि प्राथमिक सहाय्यक शिक्षक संवर्गातील तब्बल ७१९ पदे अतिरिक्त श्रेणीत आली आहेत. यामुळे शिक्षकांच्या समादेशनाचा प्रश्न गंभीर वळणावर आला आहे. परिणामी जिल्हाभरातील तब्बल ७१९ गुरुजींना अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कोरपना तालुक्यात सर्वाधिक ८८ शिक्षक अतिरिक्त श्रेणीत आले आहेत.शिक्षण विभागाच्या आयुक्ताने फतवा काढून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून यासंदर्भात अहवाल मागवला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील १ हजार ५७२ प्राथमिक शाळेपैकी तब्बल ३३५ शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद माध्यमिक व माजी शासकीय माध्यमिक शाळा २३ आहेत. येथील विद्यार्थी संख्या आजघडीला समाधानकारक असली तरी भविष्यात येथेही पटसंख्येचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचे शिक्षण धोरण गाव तेथे शाळा असे असून शिक्षणाचा मुलभूत अधिकार देण्याचा आहे. यासाठी काही प्रमाणात कार्यरत शिक्षक गावकऱ्यांच्या मदतीने शाळेला आधुनिकतेचे रुप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र हे प्रमाण बोटावर मोजण्या इतपत आहे.जिल्ह्यात एकूण १५ पंचायत समितीमध्ये सर्व संवर्गातील एकूण ५ हजार ९०९ शिक्षकांच्या पदाला मंजुरी आहे. यातील ५ हजार ८१७ पदे भरण्यात आली. रिक्त पदांचा अनुशेष ८१२ दर्शविण्यात आला असून सर्वाधिक शिक्षकांची रिक्त पदे वरोरा पंचायत समितीत असून त्यांचा आकडा ७५ इतका आहे. रिक्त पदाच्या आकडेवारीत चिमूर तालुका दुसऱ्या स्थानावर असून ७२ शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्व पंचायत समितीस्तरावर तब्बल ७१९ शिक्षकांचे पदे अतिरिक्त असल्याचे अहवालातून दर्शविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना सर्व शिक्षा अभियानाने बळ दिले आहे. सातत्याने नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून शाळांना आधुनिकतेची झालर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पालकांचा कल पाल्यांना इंग्रजी शाळेच्या माध्यमाकडे वळता करीत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नाही. असी बहुसंख्य पालकांची मानसिकता बनली आहे. याला कारणीभूत अपवादात्म शिक्षकही आहे. मात्र सरकारी शाळा बंद होणे, सर्वसामान्य गरीब, आदिवासी दुर्गम भारतील वरच्या मध्ये राहणाऱ्या पालकांना परवडणारे नाही. यावर शासनस्तरावर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांनीही गावाशी नाते वृद्धिंगत करण्याची तेवढीच आवश्यकता आहे. शिक्षणामुळे समाज जीवन प्रगल्भ होत आहे. याला मध्यंतरी थांबवणे योग्य नाही. पटसंख्या कमीचे कारण दर्शवून सार्वजनिक शिक्षण क्षेत्राला संपविण्याचे कट कारस्थान समन्वयातून तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यातील १ हजार ५७२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळापैकी ३३५ शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे समावेशन जवळच्या शाळेत करण्याचे शालेय शिक्षण विभागो ठरविले आहे. शासन विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची जबाबदारी स्वीकारण्याच्या तयारीत आहे. मात्र अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समावेशनाचा प्रश्न शासनाला अडचणीचा जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आस्थापना विभाग शिक्षण आणि आरोग्य विभागात सर्वाधिक कर्मचाऱ्यांची संख्या आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाला यासाठी चांगलाच घाम फुटणार आहे.चिमूर तालुक्यात सर्वाधिक शिक्षकजिल्हा परिषद अंतर्गत चिमूर तालुक्यात सर्वाधिक शिक्षकांची संख्या आहे. येथे एकूण शिक्षकांची संख्या ५७७ झाली असून येथे ५४२ पदांचा भरणा करण्यात आला आहे. चंद्रपूर ३९३ पैकी ४०७, मूल ३३८ पैकी ३४७, सावली ३९२ पैकी ३७९, पोंभुर्णा २१४ पैकी २१९, गोंडपिपरी ३८० पैकी ३४५, राजुरा ४७६ पैकी ४६८, कोरपना ४१८ पैकी ४३८, जिवती ३९३ पैकी ३६६, बल्लारपूर ११२ पैकी १०५ , भद्रावती ४४२ पैकी ४४५, वरोरा ५०३ पैकी ४९७, नागभीड ४४२ पैकी ४१७, ब्रह्मपुरी ५०५ पैकी ४९५ तर सिंदेवाही तालुक्यात एकूण ३४४ शिक्षकांच्या पदांपैकी ३४७ पदांचा भरणा करण्यात आला आहे. यात मंजूर पदे ५ हजार ९०९ असून एकूण ५ हजार ८१७ पदे भरण्यात आल्याचे दर्शविण्यात आले.बल्लारपूर तालुक्यात रिक्त पदांचा अनुशेष कमीशिक्षक संवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष बल्लारपूर तालुक्यातसर्वात कमी १२ इतका असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या ५ आहे. सिंदेवाही ४२ रिक्त व ४५ अतिरिक्त, ब्रह्मपुरी ५४ रिक्त व ४४ अतिरिक्त, नागभीड ३७ व ३२, चिमूर ७२ व ३७, वरोरा ७५ व ६९, भद्रावती ५० व ५३, जिवती ७३ व ४६, कोरपना ६८ व ८८, राजुरा ७३ व ६५, गोंडपिपरी ६८ व ३३, पोंभुर्णा ३० व ३५, सावली ५६ व ४३, मूल ४३ व ५२ तर चंद्रपूर तालुक्यात एकूण ५८ शिक्षकांची पदे रिक्त असून तब्बल ७२ शिक्षकांना अतिरिक्त म्हणून ठेवण्यात आले आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा अनुशेष ८१२ तर ७१९ गुरुजींना अतिरिक्तच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.