चंद्रपूर : आरोग्य विभाग, चंद्रपूर शहर महानगरपालिका व इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने ९ फेब्रुवारी रोजी सरदार पटेल प्राथमिक शाळा, व्हेटर्नरी दवाखान्याजवळ चोर खिडकी तसेच तथागत बुद्ध विहार घुटकाळा येथे बाह्य संपर्क आरोग्य शिबिर तथा महाआरोग्य अभियान घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती अंजली घोटेकर, नगरसेविका, संगिता पेटकुले, विना खनके, सकीना अंसारी, नगरसेवक प्रविण पडवेकर, मनपा नोडल अधिकारी अंजली आंबटकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. प्रसाद पोदुखे, मनपा शहर कार्यक्रम व्यवस्थापक नरेंद्र जनबंधु प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरामध्ये ४४६ व ३४० लाभार्थ्यांनी मोफत वैद्यकिय तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंजली आंबटकर तसेच नरेंद्र जनबंधु यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ३ च्या वैद्यकिय अधिकारी कीर्ती राजुरवार तसेच आरोग्य सहायक यु.टी. मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. अश्विनी भारत, डॉ. विजया खेरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शहर कार्यक्रम व्यवस्थापक नरेंद्र जनबंधु, वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार, डॉ. अश्विनी भारत, मनपा आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.महानगर पालिकेने या शिबिराचे आयोजन करून नागरिकांची आरोग्य तपासणी केल्याने अनेकांना दिलासा मिळाला. गरीब रूग्णांचा याचा चांगला लाभ झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
महाआरोग्य शिबिरात ७०० रुग्णांची तपासणी
By admin | Updated: February 11, 2016 01:38 IST