शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

काँग्रेसच्या काळात ७० टक्के थकीत रकमेचे वाटप

By admin | Updated: April 20, 2017 01:32 IST

येथील नगर पालिकेत काँग्रेस सत्तेत असताना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची देयक रक्कम टप्प्याटप्प्याने दिल्या गेली आहे.

बल्लारपूर पालिकेत श्रेयाची लढाई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम बल्लारपूर : येथील नगर पालिकेत काँग्रेस सत्तेत असताना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची देयक रक्कम टप्प्याटप्प्याने दिल्या गेली आहे. मागील पाच वर्षात पाच कोटी रुपये म्हणजे ७० टक्के रक्कम देण्यात आली आहे, असे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे. सद्या बल्लारपूर नगरपाकिलेवर भाजपाची सत्ता असून या नगर पालिकेतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासून उपदान, रजा, रोखीकरण, अंश राशी, जीपीएफ आणि पाचवे आणि सातवे वेतन आयोग इत्यादी बाबतची थकीत रक्कम १४ एप्रिलला संपूर्णपणे देण्यात आली. या थकीत निधी वाटपाला नगर पालिकेने ‘ऋणमुक्त सोहळा’ असे नाव दिले. या प्रकारातून सर्व थकबाकी भाजपा प्रशासन काळातच अदा झाली. काँग्रेस प्रशासनाने काहीच केले नाही, असा चुकीचा संदेश जातो, तसे होवू नये याकरिता या नगर पालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते देवेंद्र आर्य यांनी न.प. प्रशासनात काँग्रेसच्या कार्यकाळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची दिलेली रक्कम याचा हिशोब प्रसिद्धी पत्रकातून मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २०११ ते २०१६ या कार्यकाळात नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी आणि छाया मडावी यांच्या कार्यकाळात १२५ कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. रजनी मुलचंदानी यांनी आपल्या कार्यकाळात एक कोटी ७० लाख ३९ हजार ९४ तर छाया मडावी यांच्या कार्यकाळात तीन कोटी १९ लाख २५ हजार ९७६ रुपये असे एकूण पाच कोटी रुपये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नगर पालिकेचे वनविकास महामंडळावर मालमत्ता करापोटी गेल्या २४ वर्षापासून असलेली थकबाकी मिळविण्याचा टोकाचा प्रयत्न मुख्याधिकारी विपीन मुद्धा आणि नगराध्यक्ष छाया मडावी यांनी चालविला होता, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. यावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये या विषयावर श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या सर्व बाबींची माहिती असल्याने कोणी काय केले, याची जाण आहे. (तालुका प्रतिनिधी)