शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे ७० घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:36 IST

कोरपना तालुक्यातील मांडवा व परिसराला रविवारी दुुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळाचा जबर तडाखा बसला. यात जवळपास ७० घरांचे अंशत नुकसान झाले. यात सुदैवाने प्राणहानी टळली असली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देघरांची छप्परे उडाली : विद्युत खांब वाकले

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील मांडवा व परिसराला रविवारी दुुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळाचा जबर तडाखा बसला. यात जवळपास ७० घरांचे अंशत नुकसान झाले. यात सुदैवाने प्राणहानी टळली असली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.रविवारी सकाळपासून कडाक्याची उन्ह होती. मात्र दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. दुपारी ३.३० वाजता जोरदार वादळ सुटले. वादळामुळे गावातील घरांचे छप्पर, मांडव उडाले असून विद्युत खांबही वाकले आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा पुर्णतव खंडित झाला आहे. वादळात मांडवा येथील गोसाई न्याहारे, घनश्याम कोराम, बंडू मरस्कोल्हे, दिलीप टेकाम, विठ्ठल राऊत, शत्रुघ्न सिडाम, महेंद्र डावरे, श्यामराव मरस्कोले आदींच्या घरांवरील छप्परांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजेश पिदूरकर यांच्या बैलालाही जबर मार बसला. बैलावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कोरपन्याचे तहसीलदार हरिश गाडे यांनी रविवारीच आपादग्रस्त मांडवा या गावी भेट देऊन नुकसानीचे स्वत: पाहणी केली. आपदग्रस्तांना योग्य ती मदत पुरविण्याचे अधिकाºयांना निर्देश दिले. यावेळी मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी कमलवार, सरपंच, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. या गावाला यापूर्वीही वादळाचा दोनदा तडाखा बसला होता, हे विशेष. आपादग्रस्तांना तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.प्रशासनातर्फे आपादग्रस्त गावाला योग्य ती मदत पुरविण्यात येत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. वादळातील नुकसानग्रस्त घरांचे सर्र्वेेक्षण करण्यात आले आहे.- हरीश गाडे,तहसीलदार, कोरपना.