शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात  ७ हजार २१ जनावरे ठार

By राजेश मडावी | Updated: May 11, 2023 17:20 IST

Chandrapur News देश-विदेशातील पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमखास संधी असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रासह राज्यभरातील जंगलांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ७ हजार २१ जनावरे ठार झाल्याची अधिकृत माहिती पुढे आली आहे.

राजेश मडावी

चंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमखास संधी असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रासह राज्यभरातील जंगलांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ७ हजार २१ जनावरे ठार झाल्याची अधिकृत माहिती पुढे आली. दरम्यान, गावालगतच्या वनक्षेत्रातील चराईचे क्षेत्र वर्षागणिक घटू लागल्याने पाळीव जनावरांचे बळी जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि जंगलांतील नैसर्गिक गवताचे प्रमाण कमी झाल्याने वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी सुरू आहे; तर दुसरीकडे पाळीव जनावरे जंगलात जाण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यप्राण्यांकडून ठार होण्याच्या घटना वाढीस लागल्या.  त्यातच मागील काही वर्षात तृणभक्षक प्राण्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. विस्तृत वनक्षेत्र आता मर्यादित होऊ लागले. पाळीव जनावरांची संख्या वाढून वनांवरील अवलंबनात देखील वाढ झाली. परिणामी, वनक्षेत्र घटल्याने तृणभक्षक प्राणी पिकांना लक्ष्य करीत आहेत.

पीक नुकसानीची ३७ हजार ६२३ प्रकरणे

२०२२-२३ वर्षात वन्य प्राण्यांकडून पिकांच्या नुकसानीची ३७ हजार ६२३ प्रकरणे घडली. ५२२ जनावरे जखमी तर ७ हजार २१ जनावरे ठार झाली. २०२०-२१ मध्ये पीक नुकसानीची ९७ हजार ७४२ प्रकरणे घडली. २०२१-२२ मध्ये पीक नुकसानीच्या ८७ हजार ६७५ घटना घडल्या. ८१५ जनावरे जखमी तर १२ हजार १४५ जनावरांचा मृत्यू झाला, अशी नोंद महाराष्ट्र वन विकास विभागाच्या संकेतस्थळावरील टिपणीत नमुद आहे.

वन विभाग म्हणतो, 

वन्यप्राणी व मानव संघर्ष टाळण्यासाठी गावागावांतजागृती सुरू असून शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई दिली जात आहे. वनांवरील अवलंबन कमी करून पुनर्वसन व जंगलालगतच्या शेताला कुंपण करणे, शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानातून सौर उर्जा कुंपण-चेन लिक कुंपण दिले जात आहे. वनक्षेत्रात गुरे चरू नयेत, यासाठी मनरेगा व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून गावागावांत स्टॉल फीडिंगला चालना देणे सुरू आहे. नुकसान कमी करण्यासाठी पर्यायी पिकांबद्दल माहिती व प्रोत्साहन दिले जात आहे, असा दावा वन विभागाने केला.

टॅग्स :Tigerवाघ