शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या फलोत्पादन अभियानाचा ६४५ शेतकऱ्यांना लाभ

By admin | Updated: September 28, 2016 00:50 IST

पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे.

४ कोटी ६ लक्ष रूपयांचे अनुदान वाटले : यावर्षी ५२ लाखांचा आराखडाचंद्रपूर : पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे. फळझाडांना प्रोत्साहन देण्यासोबतच या पीक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरली आहे. जिल्ह्यात ६४५ शेतकऱ्यांनाी या योजनेंतर्गत फळबागांची लागवड करत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. फलोत्पादन अतिशय फायद्याची शेती आहे. विविध प्रकारच्या फळांना बाजारात चांगली मागणी असून दरही चांगला मिळत असल्याने या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे फार आवश्यक आहे. त्यामुळेच पारंपारिक पिकांसोबतच काही क्षेत्रात फळ पिकेही घ्यावीत, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. फळ पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना फळ शेतीकडे वळविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान हे अभियान उपलब्ध करून देत आहे.अभियानाच्या क्षेत्र विस्तार या घटकांतर्गत फळबागांमध्ये पपई, केळी, मसाला पीक, हळद, मिरची लागवड व पुष्पोत्पादन या पिकांसह त्यासाठी आवश्यक संरक्षित शेती या घटकांतर्गत हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी, प्लॉस्टीक मल्चींग, शेडनेट हाऊस, हरीतगृह यामध्ये उच्च दर्जाची भाजीपाला लागवड व साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. सदर योजनेतील काही घटक शंभर टक्के अनुदानावर राबविले जातात. तर काही ५० व ३५ टक्के अनुदानावर आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ कोटी ६ लाखांचे अनुदान विविध बाबींसाठी आतापर्यंत अदा करण्यात आले आहे. यावर्षी सुध्दा ५२ लाख रूपयांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र फलोत्पादनाखाली आणण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)