शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

६१५ ग्राम पंचायती बक्षिसास पात्र

By admin | Updated: May 20, 2014 23:33 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत ६१५ ग्रामपंचायती बक्षिसास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी

चंद्रपूर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत ६१५ ग्रामपंचायती बक्षिसास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासनाकडून दिला जाणार आहे. गावाचा विकास, पर्यावरणाचे संवर्धन, जतन करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविली जाते. योजनेसाठी निर्धारित केलेले निकष पूर्ण करणार्‍या गावांना लोकसंख्येच्या निकषानुसार दोन लाखांपासून दहा लाख रुपयापर्यंत रोख बक्षीस दिले जाते. २०१०-११ या वर्षी ३०१ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला. त्यानंतरच्या २३८ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. यावर्षी अनेक ग्रामपंचायतींनी योजनेत सहभाग नोंदविली आहे. तीन वर्षात ६१५ ग्रामपंचायतींनी योजनेत सहभागी होऊन बक्षीस मिळविले आहेत. यंदा सादर केलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. योजनेनुसार वृक्षलागवडीतील किती झाडे जगली, गाव ७५ टक्के निर्मल आहे का, करवसुली, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, मूर्ती विसर्जन संदर्भातील उपाय, ग्रामस्वच्छता, पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन हे निकष तपासण्यात येणार आहे. यात ज्या ग्रामपंचायती पात्र ठरतील, त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर, सिंदेवाही, कोरपना, राजुरा, नागभीड या तालुक्यात ग्रामपंचायतींनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बक्षिसास पात्र ठरल्या आहेत. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण उत्थानासाठी शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सुरू केली. योजनेच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत सहभागी व अपात्र ठरलेल्या गावामध्ये जनजागृती करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)