शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

६११ शाळांना ‘अ’ दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:29 IST

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला.

ठळक मुद्देशाळासिद्धी उपक्रम : ५० शाळांचा उपक्रमात सहभागच नाही

परिमल डोहणे ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला. या उपक्रमानुसार शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमुल्याकनानुसार जिल्ह्यातील ६११ शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. तर एक हजार ७८३ शाळांना ‘ब’ श्रेणी व ९५ शाळांना ‘क’ श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मात्र ५० शाळांनी उदासीनता दाखवत या उपक्रमात सहभागच घेतला नाही.संपूर्ण शाळांना दर्जानुसार श्रेणी देण्यासाठी केंद्रस्तरावरुन शाळासिद्धी प्रणाली तयार करण्यात आली होती. शाळांमधील पायाभूत सुविधा व गुणवत्तेच्या निकषांच्या आधारावर शाळांना श्रेणी देण्यात येते. त्यासाठी ४६ मानके व सात क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्यांदा मुख्यमध्यापकांना स्वत: शाळेचे मुल्यमापन करायचे होते. यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ५३९ शाळांपैकी २ हजार ४२२ शाळेने शाळासिद्धी उपक्रमातंर्गत मुल्यमापन केले होते. त्यापैकी सहभागी झालेल्या शाळांपैकी ६७ शाळांनी पोर्टलवर अर्धवट माहिती भरली. तर ५० शाळांनी अर्जच सादर केले नाही.शाळासिद्धी उपक्रमातंर्गत स्वयंमूल्यमापनात शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिक्षकांची कामगिरी या आधारावर शाळेने स्वयंमुल्यमापण केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६११ शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा, तर १ हजार ७८३ शाळांना ब श्रेणी, ९५ शाळांना क श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मात्र या उपक्रमात ५० शाळांनी सहभागच घेतला नाही.अजूनही बाह्यमुल्यमापन नाहीमुख्यध्यापकांच्या माध्यमातून शाळेचे स्वयंमूल्यमापन केल्यानंतर आलेल्या गुणांनुसार श्रेणी देण्यात आली. त्यानंतर शाळेचे बाह्यमुल्यमापन करण्यात येणार होते. मात्र अद्यापही कोणत्याही शाळेचे बाह्यमुल्यमापन करण्यात आले नाही. त्यामुळे स्वत: शाळेने मुल्यमापन करुन दिलेली श्रेणी योग्य आहे की नाही, याबाबत संभ्रम दिसून येत आहे.मुल्यमापनासाठी डाएटने केले प्रयत्नशाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक संस्था (डाएट) तर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर केंद्रस्तरावरील सर्व शिक्षकांच्या १२५ केंद्रावर विशेष कार्यशाळा घेण्यात आल्या. यात एक हजार ९६८ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ८४८ मुख्याध्यापकांनी तर ५ हजार ९९९ शिक्षकांनी सहभाग घेतला होता.शाळासिद्धी उपक्रमातंर्गत वर्षभरापूर्वी शाळांना टूल देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांनी आपल्या श्रेणीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच डीआयसीपीडीच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.- धनंजय चापलेप्राचार्य, डाएट कॉलेज, चंद्रपूर.