शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या ६० बसस्थानकांवर उभारणार मिनी थिएटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 15:33 IST

महाराष्ट्रातील तब्बल ६० बसस्थानकांवर राज्य शासन मिनी थिएटर्सची उभारणी करण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रातील तब्बल ६० बसस्थानकांवर राज्य शासन मिनी थिएटर्सची उभारणी करण्याच्या तयारीत आहे. ही थिएटर्स विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच महाराष्ट्राच्या प्रगतीत वाटाही उचलणार आहेत. प्रवाशांनाही बसची वाट पाहताना मनोरंजनाचे साधन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे बुधवारी दिली.राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चा करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचेही ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.चंद्रपूर येथे एमडीआर मॉल अ‍ॅन्ड मिराज सिनेमाचे उद्घाटन ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.सबंध महाराष्ट्रामध्ये साडे सहाशेवर बसस्थानके आहेत. यापैकी काही बसस्थानकांमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काहींची नवीन बांधकामेही सुरू आहे. या अनुषंगाने बसस्थानकावर मिनी थिएटरची संकल्पना पुढे आली. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चेअंती हा निर्णय केला आहे. राज्यातील ६० बसस्थानकांवर मिनी थियेटर्स बनविण्यात येणार आहेत. या माध्यमातून त्या बसस्थानकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातून या थिएटरमध्ये मार्गदर्शन घेता येईल, अशी माहितीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.एकाच जागेवरून या सर्व थिएटरमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान देताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करता येईल. यासोबतच विविध मनोरंजनाच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या बसची वाट पाहणाऱ्यांना एक त्या थिएटरचा उपयोग घेता येईल. असा दृष्टीकोन त्यामागे ६० थिएटरचा आहे. या साठही थिएटरमध्ये एकाचवेळी सारखी माहिती व मनोरंजन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मिराज सिनेमाचे सर्वेसर्वा दिनेश चोरडिया, महेंद्र मंडलेचा यांच्यासह शहरातील गणमान्य मंडळींची उपस्थिती होती.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार