शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

५५६ जातवैधता प्रमाणपत्र रखडले

By admin | Updated: November 12, 2016 00:51 IST

जातवैधता प्रमाणपत्राचा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी दस्तावेज सादर केल्यानंतर ...

एसएमएस सेवा : २४४ उमेदवारांचे प्रमाणपत्र उपलब्धचंद्रपूर : जातवैधता प्रमाणपत्राचा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी दस्तावेज सादर केल्यानंतर तातडीने ते निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही प्रशासकीय अडचणींमुळे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील ५५६ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र नागपूर येथील कार्यालयाकडे प्रलंबित आहेत.चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासाठी चंद्रपूर येथे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव दिलीप चव्हाण यांनी उमेदवारांनी दस्तावेज सादर केल्यावर त्यांचा वेळ व पैसा विनाकारण खर्च होऊ नये, याकरिता एसएमएस सेवा सुरु केली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २४४ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र नागपूर येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एम. एस. सूर्यवंशी यांनी गुरूवारी पाठविले. त्यांच्या वितरणाबाबत चव्हाण यांनी एसएमएस उमेदवारांना माहिती दिली आहे.या २४४ जात वैधता प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थी, निवडणुकीतील उमेदवार आणि कर्मचारी आदींचा समावेश आहे. त्या सर्वांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित आणखी ५५६ उमेदवारांचे जात प्रमाणपत्र पडताळणी तयार असून ते समितीच्या अध्यक्षांकडे स्वाक्षरीकरिता पाठविण्यात आलेले आहे. अध्यक्षांची स्वाक्षरी होऊन नागपूर येथे प्राप्त झाल्यानंतर त्या प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय गाजला होता. चंद्रपूर येथील तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी ५० वर्षांचा महसूल दाखला अनिवार्य केला होता. ज्या उमेदवारांकडे ५० वर्षांपूर्वीचा महसूल दाखला उपलब्ध नव्हता, त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे या विषयात अनेक संघटनांनी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर यापूर्वी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्राकाचीच माहिती उपलब्ध करण्यात आली. त्यानंतर हा विषय थंड झाला. जात प्रमाणपत्राप्रमाणेच जात वैधता पडताळणीचा विषयदेखील संवेदनशील आहे. त्यावर संबंधित उमेदवाराचे भवितव्य ठरत असते. (प्रतिनिधी)नागपूरच्या अध्यक्षांकडे प्रभारचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एम. एस. सूर्यवंशी यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला आहे. चंद्रपूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी एस. एम. भागवत यांनी ५ जुलै २०१६ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु भागवत चंद्रपूरच्या पडताळणी समितीच्या अध्यक्षपदाचा प्रभार स्वीकारला नाही. त्यांनी प्रतिनियुक्तीवर इतरत्र नियुक्ती मिळविली. भागवत प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे चंद्रपूरच्या समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे नागपूर येथील विभागीय समितीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांच्याकडे चंद्रपूरचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे आणखी चार जिल्ह्यांचा पदभार असल्याने ते सध्या सहा जिल्ह्यांचा कारभार सांभाळत आहेत. याशिवाय ते महसूल विभागाचीही कामे करीत आहेत. त्यामुळे ते जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.