शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

५२ दिवसांचे आंदोलन आणखी तीव्र

By admin | Updated: March 4, 2016 00:54 IST

वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी...

वनविद्या पदवीधारकांचे उपोषण : सलम ५० दिवस केले साखळी उपोषण चंद्रपूर : वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चंद्रपुरात येऊन आंदोलन छेडले आहे. सलग ५० दिवस साखळी उपोषण करूनही दखल घेतली जात नसल्याने या पदवीधारकांनी आता आंदोलन आणखी तीव्र करीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दोन दिवसांपासून आठ विद्यार्थी हे उपोषण करीत आहेत.राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि डॉ. बा.सा.को. कृषी विद्यापीठ दापोली या दोन विद्यापिठांतर्गत प्रत्येकी एक असे एकूण दोन वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालये आहेत. यातील प्रत्येक महाविद्यालयावर महाराष्ट्र शासनाचा दोन कोटी रुपयांचा खर्च होतो. यासोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय वानिकी अनुसंधान व शिक्षा परिषद देहरादून यांचेही वित्तीय सहाय्य महाविद्यालयांना मिळते. वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये ४९ वनासंबंधित विषयाचा सखोल अभ्यास केला जातो. एवढेच नाही तर वनविभागद्वारे वनकार्यानुभव (सहा महिने) आणि वनशास्त्र महाविद्यालयाद्वारे वनव्यवसायिक प्रशिक्षण (सहा महिने) दिले जाते. चार वर्षाचा वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शासनाचा प्रत्येक विद्यार्थ्यांवर जवळपास ६.५ लाख रुपयांचा वित्तीय खर्च होतो, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी या पदाच्या भरतीमध्ये १०० टक्के जागा आरक्षित करून सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील या पदवीधारक विद्यार्थ्यांनी वनमंत्र्यांच्या चंद्रपूर शहरात आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२ जानेवारीपासून येथील मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील परिसरात साखळी उपोषण सुरू केले. एखाद आठवड्यात आंदोलनाची दखल घेतली जाईल, अशी आशा या विद्यार्थ्यांना होती. मात्र तसे झाले नाही आणि साखळी उपोषण वाढत गेले. तब्बल ५० दिवस हे आंदोलन सुरूच होते. या आंदोलनादरम्यान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्यांची चारदा भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यातील सत्यता आणि न्यायिकता पडताळून पाहण्यासाठी वनमंत्र्यांनी कालावधी मागितला आणि आंदोलन मागे घेण्याची सूचना केली. तरीही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.साखळी उपोषणाचे ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर आता या विद्यार्थ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करीत बेमुदत उपोषण सुरू केले आहेत. १ मार्चपासून रोहित लांबे, नागेश डोंगरे, अक्षय पवार, महेश काकडे, हरीश गजभिये, पंकज लोनकर आणि सद्दाम हुसेन संदे हे आठ विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मागणीची दखल घेईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा त्यांचा निर्घार आहे. (शहर प्रतिनिधी)