शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

५०० कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Updated: September 18, 2016 00:52 IST

वरोरा तालुक्यातील सनफ्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टिल कंपनी बेलगाव या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांकडून कोळसा उत्खनन करुन घेतल्या जात आहे.

पत्रकार परिषद : कामगारांचा संप, खदानीचे कामकाज ठप्पचंद्रपूर : वरोरा तालुक्यातील सनफ्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टिल कंपनी बेलगाव या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांकडून कोळसा उत्खनन करुन घेतल्या जात आहे. त्या मोबदल्यात त्यांना दगड उत्खननाच्या शासकीय आदेशानुसार वेतन अदा केले जात आहे. कोळसा खदानीतील कोणतीही सुविधा कामगारांना देण्यात आलेली नाही. याविरोधात येथील कामगारांंनी १८ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत कामगारांनी दिला. यावेळी सुनिल रविदास, जालीद्र पेंदूर, मनीष रामगडे, सचिन मुवे, मधुकर फुलझले, धनपाल काळे, भोजराज डांगे आदींची उपस्थिती होती. वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे सनफ्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टिल नावाची कंपनी आहे. या कंपनीत अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. सदर कंपनीमध्ये कोळशाचे उत्खनन केले जाते. मात्र या कामगारांना दगड उत्खनन करणाऱ्या कामगारांच्या नियमानुसार वेतन दिले जाते. तसेच कामगारांना माईन्स अ‍ॅक्ट अंतर्गत देण्यात येणाऱ्या कोणत्याच सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे कामगारांना कोळसा खाणीच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे व त्यांना मिळणाऱ्या सुविधा देण्याची मागणी कामगारांनी व्यवस्थापनाकडे केली. जर मागण्या मंजूर झाल्या नाही, तर संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र व्यवस्थापन मंडळानी याची दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांनी १६ आॅगस्टपासून संप पुकारला. आता एक महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा व्यवस्थापन मंडळाकडून कोणतीही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे १५ ते २० दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा कामगारांनी पत्रकार परिषदेत दिला. (नगर प्रतिनिधी)अशा आहेत कामगाराच्या मागण्याकामगाराच्या योग्यतेनूसार वेतन देण्यात यावे, माईन्स अ‍ॅक्ट १९५२ नूसार अंडरग्राऊंड अलाऊंस, क्वार्टर अलाउंस, वाहन प्रतिपुर्ती भत्ता देण्यात यावा, दिवाळी बोनसपासून वंचित कामगारांना बोनस देण्यात यावे, खदानमध्ये कार्यरत कामगारांना हॅन्डग्लोज, अ‍ॅप्रान, टेस्टर, सेप्टी बेल्ट, टिकास आदी साहित्य देण्याते यावे, अशा कामगारांच्या मागण्या असून त्या तात्काळ पूर्ण करण्याचीही मागणी आहे.