शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० जागा रिक्त

By admin | Updated: June 18, 2016 00:40 IST

जिल्ह्यात विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० च्या वर जागा रिक्त आहेत, त्यामुळे दर्जेदार अध्यापनापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत.

पुरोगामी शिक्षक समितीची मागणी : प्रशासनाने लक्ष द्यावेचंद्रपूर : जिल्ह्यात विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० च्या वर जागा रिक्त आहेत, त्यामुळे दर्जेदार अध्यापनापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन या रिक्त जागा त्वरीत भरण्याची मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांच्याकडे निवेदनातून केली आहे. महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेने मागील वर्षभरात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व मिशन नवचेतना हे गुणवत्ता वाढीचे अभियान राबविले. सर्वत्र याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र ज्या शाळांमध्ये शिक्षकांची वर्षभरही कमतरता होती, तिथे मात्र शाळांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. येत्या सत्रात सदर अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रत्येक शाळेत पुरेशी शिक्षक संख्या असणे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे मागील तीन वर्षांपासून समायोजन प्रलंबित आहे. अनेक शाळांत अतिरिक्त शिक्षक कार्यरत आहेत तर काही शाळा मागील वर्षभर आवश्यक शिक्षकांविना होत्या. तसेच जिल्ह्यात केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची अनेक पदे वर्षभरापासून रिक्त आहेत. पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे विस्तार अधिकाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.केंद्रप्रमुखांच्या पदोन्नत्या अन्य जिल्ह्याप्रमाणे अभावितपणे करता येतात. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी हे शाळांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून शिक्षकांना मार्गदर्शन करणे, नवनवीन अध्यापन कौशल्य सांगणे, याचप्रमााणे ते प्रशासन शिक्षकामधील महत्त्वाचा दुवा म्हणूनही कार्य करीत असतात. त्यांच्या अभावी शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत कोणीच येत नसल्यामुळे अनेक शाळा नवनवीन उपक्रम राबविण्यात मागे पडत आहे. त्यामुळे पदोन्नत्या नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी केल्यास शाळा व प्रशासनामध्ये असलेला असमतोल दूर होवू शकतो, असे निवेदनातून म्हटले आहे. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंबधीही चर्चा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी विजय भोगेकर, दीपक वऱ्हेकर, हरीश ससनकर, अशोक वैद्य, निखील तांबोळी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)