शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यातील ५० टक्के शेती पडीत

By admin | Updated: August 31, 2014 23:42 IST

निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या उदासीनतेमुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तर यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

अमोद गौरकार - शंकरपूरनिसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या उदासीनतेमुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तर यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्यातील ५० टक्के जमिन यावर्षी पडीत आहे. चिमूर तालुक्यातील ८० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. तालुक्यात मोठा उद्योग नसल्याने तालुक्यातील नागरिकांचे शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. त्यातही शेकडो एकर शेतजमीन चनसल्याने कोरडवाहू शेतीवरच भर दिल्या जात आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने खचून न जाता यावर्षी चांगली शेती करावी, या नव्या जिद्दीने शेतीकरी कामाला लागले. परंतु, याहीवर्षी निसर्गाने दगा दिला. अर्धा हंगाम जाऊनही समाधानकारक पाऊस झाला नाही. अत्यल्प पावसामुळे पिके सुकत आहेत. तर भात पिकाची अजूनही लागवड झाली नाही. त्यामुळे यावेळी धानपिक होणारच नाही. तर ज्यांनी कापूस व सोयाबीन पिके घेतली त्याही पिकावर रोगांचा प्रादुर्भावामुळे तेही पिके करपल्या जात आहे.चिमूर तालुक्यात ७० हजार २३६ हेक्टर जमीन पिक क्षेत्राखाली येते. यातील १२ हजार १९९ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर उर्वरीत ५८ हजार हेक्टर जमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे निसर्गाची साथ मिळाली तरच चिमूर तालुक्यातील शेतीत भरघोस उत्पन्न मिळते. यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने दगा दिला. ज्यांनी शेतात काहीच पेरले नाही, त्यांच्या जमिनी आजही पडीत आहे. तर ज्यांनी सोयाबीन व कापूस पेरले आहेत, तेही पावसाअभावी करपू लागले आहे. करपलेले पिके पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु आवरणे कठीण झाले आहे.शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तत्काळ आर्थिक मदत वितरीत करण्याची मागणी जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून होत आहे.