शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भिवकुंड नाल्याच्या पुनरुज्जीवनासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:24 IST

राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड नाल्याच्या पुनर्जीवन कार्यक्रमासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : सिंचनाची सोय उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड नाल्याच्या पुनर्जीवन कार्यक्रमासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने यासंदर्भात १० आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पुढील कार्यवाहीसाठी निर्देशित केले आहे.जलयुक्त शिवार अभियान या शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नदी, नाले, ओढा यातील गाळ काढणे, सरळीकरण व खोलीकरण करणे ही कामे लोकसहभागातून करून या स्त्रोतांचे पुर्नजीवन करण्याचा कार्यक्रम राबविला जातो. नदी पुर्नजीवन कार्यक्रमांतर्गत भिवकुंड नाल्याचे पुनर्जीवन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने नवीन सिमेंट नालाबांध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.भिवकुंड नाला हा विसापूर गावानजिक असलेले प्राचीन जलस्त्रोत आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर निधीच्या माध्यमातून सदर नाल्याच्या पुनर्जीवन कार्यक्रमातून लघु सिंचनाची मोठी सोय उपलब्ध होणार आहे.