शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांच्या ४८३ कर्जप्रस्तावांना बँंकांकडून ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 16:08 IST

व्यवसाय तसेच सेवा उद्योग उभारण्यासाठी ७८१ बेरोजगार युवक-युवतींनीप्रस्ताव सादर केले होते. यातील तब्बल ४८३ प्रस्तावांना केराची टोपली दाखवून केवळ २९८ प्रस्तावांनाच मंजुरी दिल्याचे वास्तव पुढे आले आहे.

ठळक मुद्दे७८१ पैकी २९८ प्रकरणे मंजूर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे वास्तव

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत (पीएमईजीपी) जिल्हा उद्योग केंद्र, राज्य खादी आयोग व खादी ग्रामोद्योग मंडळामार्फ त व्यवसाय तसेच सेवा उद्योग उभारण्यासाठी २०११ ते सप्टेंबर २०१७ या वर्षांत जिल्ह्यातील ७८१ बेरोजगार युवक-युवतींनी राष्ट्रीयीकृत बँकांकडे प्रस्ताव सादर केले होते. मात्र, बँकांनी विविध कारणे पुढे करून यातील तब्बल ४८३ प्रस्तावांना केराची टोपली दाखवून केवळ २९८ प्रस्तावांनाच मंजुरी दिल्याचे वास्तव पुढे आले आहे.पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत व्यवसाय व सेवा उद्योग उभारण्यासाठी १० लाख आणि उत्पादन युनिट उद्योगासाठी २५ लाखांपर्यत कर्जपुरवठा करण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वगुंतवणूक प्रकल्पासाठी एकून किमतीच्या १० टक्के आणि अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, इतर मागासवर्ग, महिला, माजी सैनिक, दिव्यांग आणि डोंगरी क्षेत्रांतील लाभार्थ्यांसाठी ५ टक्के गुंतवणुकीची मर्यादा ठेवण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिल्या जाते. अंमलबजावणी यंत्रणा म्हणून राज्य शासनाने राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडे जबाबदारी सोपवली. बेरोगार युवकांनी चंद्रपूर जिल्हा ग्रामोद्योग अधिकाºयांकडे २०११ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत ७८१ अर्ज सादर केले होते. या अर्जांची छानणी करून संबंधित अधिकाºयांनी कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात राष्ट्रीयीकृत बँकांकडे प्रस्ताव पाठविले. परंतु केवळ २९८ प्रस्तावांनाच मंजुरी देण्यात आली. तर उर्वरित ४८३ प्रस्तावांना विविध कारणांखाली केराची टोपली दाखवली. त्यामुळे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले़ दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरू केलेल्या विशेष घटक योजनेतही हाच प्रकार घडला असून २०१६-१७ या वर्षात प्राप्त झालेल्या ९३ पैकी २८ प्रस्तावांना मंजुरी देऊन ६४ प्रस्तावांची बोळवण करण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यमान केंद्र सरकारकडून या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा सुरू असताना कर्जाचे प्रस्ताव नाकारण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढे केलेली कारणे लक्षात घेतल्यास बेरोजगार युवकांच्या संतापात भर घालणारीच आहेत.म्हणे लाभार्थीच सक्षम नाहीकर्जाचे प्रस्ताव नाकारताना राष्ट्रीयीकृत बँकांनी अफ लातून कारणे पुढे केली़ या कारणांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगाला वाव नाही,जिल्ह्याचे लक्ष्यांक केव्हाचेच पूर्ण झाले, कर्जवसुलीच होत नाही, लाभार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, असे नमूद केल्याचे दिसून येते़पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केल्यास छानणी करून संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांकडे प्रस्ताव सादर केल्या जाते. अर्जात त्रुटी असल्यास त्याही दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बँकांकडून प्रतिसाद मिळत नाही.- स. ब. कोहाडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी

टॅग्स :Marketबाजार