शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४६ अंशाचा पारा अंगावर झेलतोयं बळीराजा !

By admin | Updated: May 27, 2016 01:10 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची शेती विषयीची उदासीनता, यामुळे शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे.

बळीराजा पुन्हा व्यस्त : रखरखत्या उन्हात मशागतीच्या कामांना वेग प्रकाश काळे गोवरीनिसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची शेती विषयीची उदासीनता, यामुळे शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करुनही शेवटी हाती काहीच शिल्लक राहत नाही. केलेली मेहनतही व्यर्थ ठरते. परंतु पुन्हा उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून ४६ अंश सेल्सीअस तापमानात शेतीच्या मशागतीत बळीराजा व्यस्त झाला आहे. कुटुंबियांची पोटाची खडगी भरावी, या एकमेव आशेपोटी स्वत:चे अंग होरपळून काढत आहे.कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट आहे. देशातील ७० टक्के शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग आजकाल लहरीपणाने वागायला लागला आहे.यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्यानंतर मायबाप सरकारनेही तोकडा दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. उत्पादनापेक्षा खर्च अधिक वाढल्यने यावर्षी खर्च केलेला पैसा निघाला नाही. परिणामी शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण समजला जातो. उन्हात बाहेर पडले तर जीव कासावीस होतो. एवढे तप्त ऊन्ह आहे. अशा रणरणत्या उन्हात शेतीची कामे करणे म्हणजे जीवाचा अंत पाहण्यासारखे आहे. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागला आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. बि-बियाणे घ्यायलाही शेतकऱ्यांकडे पैसा उरला नाही. उत्पादनात घट आल्याने कर्जाचा डोंगर वाढला आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाल्याने शेती कसायची सारी इच्छाच मरुन गेली आहे. मात्र कुटुंबियांचे उपाशी पोट आजही त्याला स्वस्थ बसू देत नाही. बळीराजा ४६ अंशाचा पारा अंगावर झेलत मशागतीची कामे करीत आहे. ना निसर्गाची साथ, ना शासनाचा मदतीचा हात.शेतकऱ्यांचा वाली कोणीच उरला नाही. त्यामुळे शेतकरी पार वैतागून गेला आहे. मात्र वास्तवाशी झुंज देत जगणे हेच शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे.