शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धडक मोहिमेतून ४५९ ग्राहकांची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:20 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलाचा वेळेत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारांविरूद्ध मोहीम : मुदतीच्या आत बिल भरण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलाचा वेळेत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४५९ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे ख्ांडित करण्यात आला. तर थकबाकीदारांपैकी १ हजार २३ ग्राहकांनी कारवाईचा धसका घेत पहिल्या दिवशी ३७ लाख९५ हजार रूपयांच्या थकीत बिलाचा भरणा केला.एकीकडे वीज बिल हाती आल्याबरोबर वीज बिलाचा भरणा करणरे ग्राहक तर एकीकडे थकबाकीदार अशा दुहेरीत महावितरण आहे. विकल्या गेलेल्या विजेचा वीज बिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याची जवाबदारी पार पाडताना थकबाकीदारांमुळे महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १३ कोटी ९७ लाखांच्या घरात थकबाकी पोहोचली आहे. तर वाणिज्यीक ग्राहकांकडे ४ कोटी ९७ लाख रूपये थकबाकी आहे. औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी २ लाख रूपये थकबाकी आहे.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे १ कोटी ४१ लाख तर सरकारी कार्यालयांकडे १ कोटी ७३ लाख रूपये थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा ख्ांडित केलेल्या ग्राहकांकडे ४० कोटी ३८ लाख तसेच कृषी पंपधारकाकडे ६१ कोटी ९७ लाखांची थकबाकी आहे.महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांकडून वीजबिल विहित मुदतीत वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरण चंद्रपूर परिमंडळात अनेक ग्राहकांपयोगी योजना सुरू करण्यात आल्या असून दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक विद्युत विकास कार्यक्रम, इंफ्रा-२, आरएपीडीआरपी (पुर्नरचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम), नवीन कृषी पंपांना वीजपुरवठा देणे व नवीन ३३ केव्ही उपकेद्रांची निर्मिती आदी कामे सुरू आहेत. त्यातून ग्राहकांना शाश्वत वीज पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. ही कामे ग्राहकांना शाश्वत व योग्य दाबाचा वीजपुरवठा देण्यासाठी करण्यात येत आहेत. यामुळे सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीजबिल वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.