शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ७२ तासांच्या आतच ४४७ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

एप्रिल-मे महिन्यात कोरोना संसर्गाचा भयानक उद्रेक झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. पहिल्या लाटेदरम्यान केलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडल्या. ...

एप्रिल-मे महिन्यात कोरोना संसर्गाचा भयानक उद्रेक झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. पहिल्या लाटेदरम्यान केलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडल्या. ऑक्सिजन बेडस्‌ आणि व्हेंटिलेअर्स उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची प्रचंड धावपळ झाली. कोविड केअर सेंटरपासून तर कोविड हॉस्पिटल उभारून त्यामध्ये सुविधा निर्माण करताना तारांबळ झाली. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाइकांनी केला. परिणामी ऑक्सिजन पुरवठ्यापासून औषधी, व्हेंटिलेटर्स आणि पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन कामाला लागले. खासगी हॉस्पिटल्स कोविडसाठी ताब्यात घेतली. ३२ कोविड केअर सेंटर, ३३ डेडिकेडेट कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेडेट कोविड फॅसिलिटिजची व्यवस्था होऊ शकली; परंतु जिल्ह्यात १ जून २०२१ पर्यंत १४५४ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी एप्रिल महिन्यातील ८४९ मृत्यूचा विश्लेषण अहवाल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला. यामध्ये ४४७ रुग्णांचे मृत्यू उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ७२ तासांत झाल्याचे नमूद केले आहे.

एप्रिल महिन्यातील डेथ परसेंट

एप्रिल महिन्यात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांत १२० (१४.३० टक्के), ४८ तासांत १४६ (१७.१९ टक्के), ७२ तासांनंतर १३४ (१५.७८ टक्के), गृह विलगीकरणात दोन (०.२३ टक्के) आणि ७२ तासांच्या आत ४४७ (५२.६५ टक्के), अशा एकूण ८४९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नोंदविले आहे.

एकूण रुग्ण ८२०९३

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण ७९ हजार ११६

व्हेंटिलेटर लावावे लागलेले रुग्ण १२००

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ११.१५

६३ व्हेंटिलेटर शिल्लक

जिल्ह्यात ९९ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. आरटीपीसीआर व अँटिजन चाचण्या वाढवूनही सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या उतरणीला लागली आहे. त्यामुळे केवळ ३६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, ६३ व्हेंटिलेटर (३६.३६ टक्के) शिल्लक आहेत.

५६६ ऑक्सिजन बेडस्‌ रिकामे

कोरोनाचा उद्रेक पीक पॉइंटला गेल्यानंतर ऑक्सिजन बेडस्‌ची संख्या अपुरी पडली होती. मात्र, प्रशासनाने एक हजार ६१ ऑक्सिजन बेडस्‌ची व्यवस्था केली. आता रुग्णसंख्या कमालीची घटल्याने ५६६ ऑक्सिजन बेडस्‌ रिकामे आहेत. सद्य:स्थितीत २८२ आयसीसी उपलब्ध असून, २०५ रुग्ण उपचाराखाली आहेत, तर ७७ आयसीयू शिल्लक आहेत.