शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

४४४ मामा तलाव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 27, 2014 23:23 IST

धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. मात्र या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पाहिजे तसे लक्ष पुरवीत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल

चंद्रपूर : धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. मात्र या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पाहिजे तसे लक्ष पुरवीत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल ४४४ तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सावली तालुक्यातील सर्वाधिक १२३ मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे.यावर्षी अर्धाअधिक पावसाळा होऊनही पाहिजे त्या प्रमामात जलसाठा नाही. अनेक जलसाठे अर्धेही भरले नाही. अशावेळी भविष्यात पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे गावांतील प्रत्येक तलाव, विहिरी तसेच अन्य जलसाठ्यांतील आहे ती पाण्याची पातळी टिकविणे महत्त्वाचे आहे.जिल्ह्यात १६७८ माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाच्या भरोवशावर काही गावांमध्ये गुरांना पिण्यासाठी पाणी, सिंचन, मच्छीमारी, शिंगाडा पिक घेतल्या जाते. विशेष म्हणजे या तलावांमुळे गावातील पाण्याची पातळीही वाढते. मात्र या तलावापैकी तब्बल ४४४ तलावांची देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने ते सध्यास्थितीत चिंताजनक स्थितीत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक तलाव सिंदेवाही तालुक्यात आहे. विशेष म्हणजे सावली तालुक्यात सर्वाधिक तलाव दुर्लक्षीत आहे. या तालुक्यात २६१ माजी मालगुजारी तलाव आहे. यातील तब्बल १२३ तलाव सद्यास्थितीत सुस्थितीत नाही.त्यामुळे तताव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. (नगर प्रतिनिधी)