शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

९५ लाख रोपांनी बहरल्या ४३ रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:55 IST

जिल्ह्यातील ४३ रोपवाटिकांमुळे विविध प्रकारची तब्बल ९५ लाख ५१ हजार ४४ रोपे जोमाने बहरली असून जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी या रोपांचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या निर्देशाची फ लश्रुती : चंद्रपूर जिल्ह्यात ७९ लाख वृक्ष लागवडीसाठी यंत्रणा सज्ज

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ४३ रोपवाटिकांमुळे विविध प्रकारची तब्बल ९५ लाख ५१ हजार ४४ रोपे जोमाने बहरली असून जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी या रोपांचा वापर केला जाणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार नियोजन केल्याने वन विभागाला यावेळी मोठे यश आले. विशेष म्हणजे यंदाच्या मोहिमेसाठी रोपांची टंचाई भासणार नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून दिसून आले.यंदा शासनाने जिल्ह्याला ७७ लाख २४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले. मात्र वन विभागाने आणि सर्व शासकीय यंत्रणांनी ७९ लाख पाच हजार रोपे लागवडीचे नियोजन केले आहे. ग्लोबल वार्निंगमुळे हवामानात प्रचंड बदल होत आहे. या बदलांमुळे मानवी जीवनावर अनिष्ठ परिणाम झाला. पर्यावरण संतुलनासाठी शासनाचे विविध विभाग व लोकसहभागातून १ जुलै २०१६ ला दोन कोटी ८२ लाख वृक्ष लागवड केले. तर २०१७ मध्ये पाच कोटी २७ लाख वृक्षांची लागवड झाली. १ ते २१ जुलै २०१८ दरम्यान वनविभाग, सामाजिक वणीकरण, वनविकास महामंडळ, निमशासकीय संस्था, स्वयंसेवी, सहकारी संस्था, शाळा व महाविद्यालयांच्या सहकार्याने मोहीम यशस्वी झाली.यंदा जुलैमध्ये जिल्ह्यासाठी ७७ लाख २४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असले तरी वनविभागाने ७९ लाख ५ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले. ही मोहीम हमखास यशस्वी होईल, असा दावा विभागीय वनाधिकारी तथा समन्वयक अशोक सोनकुसरे यांनी केला आहे.वृक्ष लागवडीचे विभागीय उद्दिष्टआगामी जुलै महिन्यात लावण्यात येणाºया वृक्ष लागवडीसाठी वनविभागाने सूक्ष्म नियोजन केले. त्यानुसार विभागनिहाय उद्दिष्ट देण्यात आले. चंद्रपूर वन विभाग, ब्रह्मपुरी, मध्य चांदा वनविभागाकरिता ३१ लाख १० हजार, सामाजिक वनीकरण ३ लाख ८४ हजार, वनविकास महामंडळ १४ लाख ९८ हजार, वन्यजीव विभाग ४ लाख ७३ हजार, इतर यंत्रणा १२ लाख २७ हजार आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ९ लाख ८४ हजार व खासगी उद्योगांना २ लाख २९ हजार असे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग