शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

४२० गावातील नागरिकांना खासगी वाहतुकीचाच आधार

By admin | Updated: October 30, 2015 01:06 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी’ ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे.

चंद्रपूर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी’ ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही एसटीची बस पोहचली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना आजही खाजगी वाहनाने किंवा पायी प्रवास करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्हा जंगलव्याप्त आहे. कोरपना, जिवती, राजुरा आदी तालुक्यातील गावे पहाडीवर वसलेले आहेत. या गावातील नागरिकांना शासनाच्या सोयीसुविधा पुरवण्याचे काम प्रशासनस्तरावरुन सुरु आहे. मात्र, दुर्गम भागातील गावांमध्ये आजही प्रशासनाच्या सोयीसुविधा पोहचू शकलेल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण १६७३ गावे आहेत. यात फक्त १ हजार २३३ गावांमध्ये एसटी बस सरू करण्यात आली आहे. दुर्गम भागात पहाडावर असलेल्या गावातील नागरिकांनी आपल्या गावात एसटी बससेवा सुरू व्हावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, बससेवा सुरू करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे अद्याप ४२० गावांमध्ये बससेवा सुरू होऊ शकलेली नाही. ज्या गावांमध्ये राज्य परिवहन मंडळाची बससेवा उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये खाजगी वाहतुकीला ऊत आला आहे. वाहतुकीची सुविधा नसल्याने प्रवाशी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत असतात. परिणामी खाजगी वाहतुकदार हे प्रवाशांना जनावरे कोंबल्यासारखे वाहनात भरून वाहतूक करीत असतात. यामुळे अनेकदा मोठे अपघातही घडले आहेत. मात्र, याची दखल घेऊन बससेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना झालेल्या नाहीत. दुर्गम भागात जंगलात, पहाडावर वसलेल्या अनेक गावांमध्ये रस्त्याची व्यवस्था नाही. तर ज्या गावांमध्ये रस्त्याचे बांधकाम झाले आहे, त्या गावात जाण्याऱ्या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने रस्ते पुर्णत: उखडलेले आहेत. त्यामुळे उखडलेल्या रस्त्याने बस धावू शकत नाही. उखडलेल्या रस्त्यामुळे बसगाडीचे नुकसान होत असल्याने अनेक गावांत सुरू झालेली बससेवा बंद करण्यात आल्याचाही प्रकार अनेकदा एसटी आगाराकडून घडला आहे. याचा त्रास दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासन व परिवहन मंडळाने दुर्गम भागातील नागरिकांची प्रवासासाठी होत असलेली दमछाक थांबविण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)बससेवेअभावी विद्यार्थ्यांची होरपळबससेवा सुरू नसल्याने अनेक गावातील विद्यार्थ्यांची होरपळ होत आहे. प्राथमिक शिक्षणाची गावातच सोय असली तरी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरी भागात जावे लागते. मात्र बससेवाच नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर जाता येत नाही. परिणामी अनेक गावातील विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षण घेणे सोडून देत असल्याचे वास्तव्य आहे. अपूर्ण रस्त्यांचा अडथळादुर्गम भागातील अनेक गावांमध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. गावात जाण्यास योग्य रस्ता नसल्यास उखडलेल्या रस्त्यामुळे बसगाडीचे नुकसान होते. त्यामुळे एसटी आगार ज्या गावांत योग्य रस्ते नाही, अशा गावांमध्ये बससेवा सुरू करण्यास उदासिन आहे.