शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे ४२ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:40 IST

महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज शनिवारी मनपाच्या सभागृहात पार पडली.

स्थायी समितीची सभा : अमृत योजना, उड्डाणपुलासाठी निधीची तरतूदचंद्रपूर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज शनिवारी मनपाच्या सभागृहात पार पडली. यात महापालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीसमोर २०१७-१८ चा ४२ लाख ४९ हजार रुपये शिलकीचा अंदाजपत्रक सादर केला. या अर्थसंकल्पाला सभापती संतोष लहामगे यांच्यासह सर्व सदस्यांनी मंजुरी प्रदान करण्यात केली असून पुढील मान्यतेसाठी आता हा अर्थसंकल्प आमसभेत सादर होणार आहे.या अर्थसंकल्पात महानगरपालिकेचे महसुली उत्पन्न सुमारे १९४.५७ कोटी राहणार असून सर्व शासकीय अनुदाने मिळून २०१७-१८ मध्ये रुपये ३६३.९२ कोटीचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. सुरुवातीची शिल्लक आठ लाख १९ हजार रुपये अंदाजित करण्यात आली आहे. २०१७-१८ च्या महानगरपालिकेच्या शासकीय योजनासहित खर्च ३८१.९१ कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.यात अमृत योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, बाबूपेठ उडाणपूल, १४ वा वित्त आयोग इत्यादी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश असून अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वासाठी घर, १४ वा वित्त आयोगामधून घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेअंतर्गत शौचालय इत्यादी बाबींवर अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका निधीमधून विद्यार्थ्यांकरिता मॉडेल स्कूल, दिव्यांगासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच स्मशानभूमी निर्माण व बगीचा विकासासाठीही या अर्थसंकल्पात बरीच तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर या संकल्पनेसाठी पुन्हा शहर सौंदर्यीकरणावर खर्च करण्याची तयारी या अर्थसंकल्पात आहे.याशिवाय नवीन फायर स्टेशन, वाहनतळ, पथदिवे आधुनिकीकरण इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. विविध शासकीय योजनेअंतर्गत मनपा हिस्यासाठी अर्थसंकल्पात ३०.९५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मनपाच्या स्थायी समितीत या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असली तरी सर्वसाधारण सभेत यावर जोरदार चर्चा होणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. (शहर प्रतिनिधी)